संशोधन प्रक्रियेसाठी अखेर मुदत
By Admin | Updated: December 27, 2014 00:46 IST2014-12-27T00:28:52+5:302014-12-27T00:46:38+5:30
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने संशोधन प्रक्रियेसाठी अखेर मुदतवाढ जाहीर केली असून, विद्यार्थ्यांना आता १५ जानेवारीपर्यंत आॅनलाईन नोंदणी करता येईल.

संशोधन प्रक्रियेसाठी अखेर मुदत
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने संशोधन प्रक्रियेसाठी अखेर मुदतवाढ जाहीर केली असून, विद्यार्थ्यांना आता १५ जानेवारीपर्यंत आॅनलाईन नोंदणी करता येईल.
‘लोकमत’ने शुक्रवारी ‘संशोधन प्रक्रियेसाठी मुदतवाढीची शक्यता’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यानुसार ‘बीसीयूडी’चे संचालक डॉ. कारभारी काळे यांनी कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्याशी चर्चा केली. तेव्हा कुलगुरूंच्या आदेशानुसार आॅनलाईन नोंदणीसाठी १५ जानेवारी, तर हार्ड कॉपी सादर करण्यासाठी २० जानेवारीपर्यंतची मुदतवाढ डॉ. काळे यांनी जाहीर केली.
रत्नागिरी येथे चार दिवसांपूर्वी झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत ‘पेट-१’ आणि ‘पेट-२’ उत्तीर्णांनाही संशोधनासाठी कायमस्वरूपी पात्र समजण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला. दुसरीकडे २६ डिसेंबर ही ‘पीएच. डी.’ प्रक्रियेसाठी आॅनलाईन नोंदणीची अखेरची मुदत होती. या प्रक्रियेत ‘पेट-१’ व ‘पेट-२’ उत्तीर्णांना सहभागी होण्यास अवधी मिळत नव्हता. त्यामुळे मुदतवाढ देणे गरजेचे होते. आज ‘बीसीयूडी’चे संचालक डॉ. काळे यांनी हा मुद्दा कुलगुरूंच्या निदर्शनास आणून दिला.