खदाणीत बुडून मायलेकीचा अंत
By Admin | Updated: May 28, 2017 00:30 IST2017-05-28T00:19:32+5:302017-05-28T00:30:35+5:30
भोकरदन : धुणे धुण्यासाठी खदाणीवर गेलेल्या मायलेकीचा पाण्यात बुडून करुण अंत झाला.

खदाणीत बुडून मायलेकीचा अंत
लोकमत न्यूज नेटवर्क
भोकरदन : धुणे धुण्यासाठी खदाणीवर गेलेल्या मायलेकीचा पाण्यात बुडून करुण अंत झाला. जुनी कुंभारी शिवारातील सरकारी खदाणीत शनिवारी दुपारी दोन वाजता ही घटना घडली.
खदाणीवर काम करणाऱ्या कलाबाई रामचंद्र पवार (३५, रा. भीवगाव) या आरती (९) व भारती (५) या मुलीसह धुणे धुण्यासाठी खदाणीवर गेल्या होत्या. आरती पाय घसरून पाण्यात पडली. तिला वाचविण्यासाठी कलाबाईंनी पाण्यात उडी घेतली. मात्र, पोहता येत नसल्यामुळे दोघींचा पाण्यात बुडू लागल्या. सोबतच्या भारतीने धावत जाऊन पसिरात काम करणाऱ्या मजुरांना घडलेला प्रकार सांगितला. मजूर खदाणीवर पोचपर्यंत दोन्ही मायलेकींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. दरम्यान, मजुरांनी मायलेकींचा मृतदेह पाण्याबाहेर काढला. भोकरदन ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन झाल्यानंतर मायलेकींचा मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.