घराच्या दुसऱ्या मजल्यावरून पडून चिमुकलीचा अंत

By Admin | Updated: June 20, 2016 00:55 IST2016-06-19T23:28:48+5:302016-06-20T00:55:56+5:30

औरंगाबाद : घराच्या दुसऱ्या मजल्यावरून पडल्याने तीनवर्षीय चिमुकलीचा अंत झाल्याची घटना शहरातील जयभवानीनगर सिडको भागात घडली. या घटनेची मात्र कोठेही नोंद करण्यात आलेली नाही.

The end of the chimukula fell from the second floor of the house | घराच्या दुसऱ्या मजल्यावरून पडून चिमुकलीचा अंत

घराच्या दुसऱ्या मजल्यावरून पडून चिमुकलीचा अंत

औरंगाबाद : घराच्या दुसऱ्या मजल्यावरून पडल्याने तीनवर्षीय चिमुकलीचा अंत झाल्याची घटना शहरातील जयभवानीनगर सिडको भागात घडली. या घटनेची मात्र कोठेही नोंद करण्यात आलेली नाही.
सूत्रांनी सांगितले की, जयभवानीनगर सिडको येथे मातेसह घराच्या गच्चीवर धुतलेले कपडे वाळू घालण्यासाठी तीनवर्षीय रुचिका ओमप्रकाश चौधरी नावाची चिमुकली गेली होती. याप्रसंगी तोल जाऊन ती खाली कोसळली. या घटनेत गंभीर जखमी झाल्यानंतर तिला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना तिची प्रकृती अधिकच गंभीर बनल्याने तिला घाटीत हलविण्यात आले.
अपघात विभागात दाखल करण्यापूर्वीच तिचा रस्त्यात मृत्यू झाला. अपघात विभागातील डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले. याप्रसंगी मात्र तिच्या नावाची नोंद न करता चिमुकलीला घेऊन नातेवाईक घाटीतून बाहेर पडले. नाव नोंदणी करण्यापूर्वीच ते चिमुकलीला घेऊन गेल्याने तिचे नाव सांगता येत नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

Web Title: The end of the chimukula fell from the second floor of the house