शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ दावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकूण वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
2
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
3
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
4
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
6
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
7
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
8
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
9
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
10
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
11
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
12
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?
13
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
14
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
15
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
16
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
17
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
18
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
19
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
20
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत

उद्या मुकुंदवाडीपासून पुढे अतिक्रमणे हटवणार; सकाळीच पथक दाखल होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 20:00 IST

महापालिका दुभाजकापासून ३० मीटर डावीकडे, ३० मीटर उजवीकडे टेप लावून कारवाई करणार

छत्रपती संभाजीनगर : मुकुंदवाडी भागातील २२९ अतिक्रमणे महापालिकेने शुक्रवारी जमीनदोस्त केली. तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर मंगळवारी पुन्हा मोहीम जोमाने सुरू होणार असून, सकाळी ९:३० वाजता महापालिकेचे पथक या भागात दाखल होणार आहे. निवासी भागातील नागरिकांना स्वत:हून अतिक्रमणे काढून घेण्यासाठी अवधी देण्यात आला असला, तरी व्यावसायिक मालमत्तांना वेळ दिला जाणार नाही. मुकुंदवाडी येथील जिमखाना रस्त्यावरून कारवाईला सुरुवात होणार आहे.

जुन्या आणि नवीन शहर विकास आराखड्यानुसार जालना रोड ६० मीटर (१९६ फूट) दर्शविण्यात आला आहे. त्यात सर्व्हिस रोडचाही समावेश आहे. शुक्रवारी महापालिकेच्या नगररचना विभागाने मुकुंदवाडीत दुभाजकापासून डावीकडे ३० मीटर (९८ फूट) आणि उजवीकडे ३० मीटर टेप लावून मोजणी केली. ३० मीटर जागा संपल्यानंतर प्रत्येक मालमत्ताधारकाने आपल्या मालकीची ६ मीटर (१९ फूट) जागा रिक्त सोडणे बंधनकारक आहे. या जागेवर मालमत्ताधारकांचा ताबा असेल, पण तेथे त्याला बांधकाम करता येत नाही. ही जागा कायमस्वरूपी मोकळी ठेवावी लागते. त्यानुसारच महापालिकेने पाडापाडी केली. मंगळवारीसुद्धा महापालिका दुभाजकापासून ३० मीटर डावीकडे, ३० मीटर उजवीकडे टेप लावून कारवाई करणार असल्याचे अतिक्रमण हटाव विभागाचे प्रमुख संतोष वाहुळे यांनी सांगितले. अतिक्रमणे पूर्णपणे काढल्यानंतर सर्व्हिस रोडचे नियोजनही मनपाने केले असल्याचे त्यांनी नमूद केले.

मोर्चामुळे मोहीम थांबविण्याची विनंतीसोमवारी सकाळी ११ वाजता क्रांती चौक येथून डॉ. बाबासाहेब आंबेडकर अन्याय, अत्याचारविरोधी कृती समितीतर्फे मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. याठिकाणी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवावा लागणार आहे. त्यामुळे सोमवारी अतिक्रमण हटाव मोहीम थांबवून मंगळवारी सुरू करावी, अशी विनंती पोलिसांनीच महापालिकेला रविवारी रात्री केली. पोलिसांची विनंती महापालिकेने मान्य केली.

एकाही मालमत्ताधारकाला नोटीस नाहीमहापालिकेने मागील दोन ते तीन दिवसांमध्ये एकाही मालमत्ताधारकाला नोटीस दिलेली नाही. भोंगे लावून जाहीर सूचना दिली. जाहीर प्रकटनाद्वारे यापूर्वीच स्वत: अतिक्रमणे काढून घ्यावीत, असे आवाहन केल्याचे वाहुळे यांनी सांगितले.

सकाळीच पथक दाखल होणारमहापालिकेचे पथक मंगळवारी सकाळी ९:३० वाजता मुकुंदवाडी भागात दाखल होईल. यावेळी अधिक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. या कारवाईला काही नागरिक, संघटना, पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून विरोध होत आहे. परिस्थितीचा अंदाज घेऊन पोलिस बंदोबस्तात वाढ करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

पोलिस आयुक्त, मनपा प्रशासकांची चर्चाकारवाईपूर्वी पोलिस आयुक्त प्रवीण पवार आणि मनपा प्रशासक जी. श्रीकांत यांची चर्चा होणार आहे. या चर्चेनंतर पुढील कारवाईला सुरुवात होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. साधारण मंगळवारी सकाळी ही चर्चा अपेक्षित आहे.

भोंगे लावून नागरिकांना सूचनामहापालिकेने मागील दोन दिवसात मुकुंदवाडी, चिकलठाणा, केंब्रिजपर्यंत मालमत्ताधारकांना भोंगे लावून पूर्वसूचना दिली आहे. ६० मीटरच्या आतील अतिक्रमणे स्वत:हून काढून घ्यावीत, असे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.

इम्तियाज जलील यांची भेटएमआयएमचे माजी खा. इम्तियाज जलील यांनी रविवारी सायंकाळी मुकुंदवाडी भागाला भेट देऊन पाहणी केली. व्यापारी, नागरिकांसोबत चर्चा करून त्यांच्या व्यथा समजून घेतल्या. व्यापाऱ्यांनीही आपले दु:ख त्यांच्यासमोर मांडले.

कायदेशीर बाबी तपासूनच कारवाई : जी. श्रीकांतअतिक्रमण हटाव मोहीम राबविताना महापालिका सर्व कायदेशीर बाबी तपासूनच काम करीत आहे. जालना रोडवर रस्त्याच्या डावीकडे आणि उजवीकडे ३० मीटर जागा रिकामी अपेक्षित आहे. या जागेच्या आत कोणी अनधिकृत बांधकाम, टपरी, दुकान थाटले असेल तरच कारवाई केली जाईल. ३० मीटरपेक्षा जास्त पुढे जाऊन कारवाई केली जाणार नाही. ३० मीटरनंतरही सामासिक अंतर सोडणे बंधनकारक आहे. कोणाकडेही बांधकाम परवानगी नाही. सर्व अनधिकृत आहेत. मी संबधितांना बांधकाम परवानगी, गुंठेवारी केल्याचे प्रमाणपत्र दाखवावे, असे आवाहनही मनपा प्रशासक जी. श्रीकांत यांनी केले.

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमणAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर