पोलिस संरक्षणात काढले अतिक्रमण
By Admin | Updated: June 12, 2016 22:55 IST2016-06-12T22:54:32+5:302016-06-12T22:55:28+5:30
परभणी : शहरातील नटराज रंगमंदिर ते जुन्या पोलिस चौकीपर्यंतच्या रस्त्यावरील अतिक्रमण हटविताना रविवारी काही दुकानदारांनी पथकाशी वाद घातला़ दुपारी झालेल्या वादानंतर पोलिस संरक्षणात मोहीम राबविण्यात आली़

पोलिस संरक्षणात काढले अतिक्रमण
परभणी : शहरातील नटराज रंगमंदिर ते जुन्या पोलिस चौकीपर्यंतच्या रस्त्यावरील अतिक्रमण हटविताना रविवारी काही दुकानदारांनी पथकाशी वाद घातला़ दुपारी झालेल्या वादानंतर पोलिस संरक्षणात मोहीम राबविण्यात आली़
मागील २० दिवसांपासून शहरात अतिक्रमण हटाव मोहीम राबविली जात आहे़ जुन्या मोंढ्यातील काही दुकानांसमोरील नालीवरील ओटे हटविण्याचे काम रविवारी सकाळी ९ वाजता सुरू झाले़ दुपारी २ वाजेपर्यंत अर्ध्या रस्त्यावरील अतिक्रमणे जेसीबीच्या सहाय्याने हटविण्यात आली़
काही व्यापारी, नागरिकांनी मोहिमेत स्वत:हून सहभागी होत अतिक्रमणे काढून घेतली़ मात्र यानंतर रघुवीर, महावीर टॉकीज व मनपाच्या संकुलासमोरील काही दुकानदारांनी अतिक्रमण काढण्यास विरोध केला़ झालेल्या प्रकारानंतर काही जणांनी आयुक्त रेखावार यांची भेट घेतली़ मात्र आयुक्तांनी मोहीम सुरू ठेवण्याचे आदेश देऊनही काहींनी अडथळा आणल्याने नानलपेठ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रौफ व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले़ पोलिसांनी वाद घालणाऱ्या नागरिकांना कारवाई करण्याचा इशारा दिला. त्यानंतर मनपाच्या पथकाने अतिक्रमण मोहीम पूर्ववत सुरू ठेवली़
सायंकाळी उशिरापर्यंत ग्रँड कॉर्नर परिसरापर्यंतचे अतिक्रमण काढण्यात आले होते़ यावेळी महापालिकेचे पथकप्रमुख सय्यद इम्रान, मीर शाकेर अली, स्वच्छता निरीक्षक मेहराज अहमद, कुऱ्हा यांची उपस्थिती होती़ (प्रतिनिधी)