मोहटादेवी मंदिर चौकातील अतिक्रमण हटविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2017 00:34 IST2017-10-03T00:34:33+5:302017-10-03T00:34:33+5:30
लोकमतने मोहटादेवी मंदिर चौक ते जागृत हनुमान मंदिर, वडगाव कोल्हाटी व छत्रपतीनगरकडे जाणाºया रस्त्यांवर दुतर्फा हातगाडीवाले व भाजीपाला विक्रेत्यांनी अतिक्रमण केल्याने नागरिकांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत असल्याचे वृत्त प्रकाशित करताच सोमवारी वाळूज एमआयडीसी पोलिसांनी अतिक्रमण हटवून रस्ता रहदारीसाठी मोकळा केला.

मोहटादेवी मंदिर चौकातील अतिक्रमण हटविले
लोकमत न्यूज नेटवर्क
वाळूज महानगर : लोकमतने मोहटादेवी मंदिर चौक ते जागृत हनुमान मंदिर, वडगाव कोल्हाटी व छत्रपतीनगरकडे जाणाºया रस्त्यांवर दुतर्फा हातगाडीवाले व भाजीपाला विक्रेत्यांनी अतिक्रमण केल्याने नागरिकांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत असल्याचे वृत्त प्रकाशित करताच सोमवारी वाळूज एमआयडीसी पोलिसांनी अतिक्रमण हटवून रस्ता रहदारीसाठी मोकळा केला.
बजाजनगरातील मोहटादेवी मंदिर चौक परिसरात हातगाडीवाले व भाजीपाला विक्रेत्यांनी रस्त्यावरच दुतर्फा अतिक्रमण करून व्यवसाय थाटले आहेत. सायंकाळच्या वेळी बाजारात खरेदीसाठी व मंदिरात दर्शनासाठी येणाºयांची संख्या जास्त असल्याने याठिकाणी मोठी गर्दी होत आहे. गर्दीमुळे दररोज मोहटादेवी मंदिर चौक परिसरात नागरिकांना वाहतूक कोंडीच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. वाहतूक कोंडीमुळे वाहनधारकांना वाहन चालविणे कठीण जात असून, मार्ग काढण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. पाच मिनिटांच्या रस्त्यासाठी अर्धा-अर्धा तास वाहनधारकांना ताटकळत थांबावे लागत आहे. पादचाºयांना तर या कोंडीतून जीव मुठीत धरून रस्ता ओलांडावा लागत आहे. सिडको व बजाजनगरात शिकवणी असल्याने सायंकाळच्या वेळी शालेय विद्यार्थ्यांना शिकवणीसाठी येथूनच जीव धोक्यात घालून ये-जा करावी लागते. नागरिकांनी अनेक वेळा एमआयडीसी व स्थानिक पोलिसांकडे अर्ज विनंत्या केल्या आहेत. परंतु संबंधित प्रशासनाकडून ठोस आणि कठोर कारवाई करून कायमस्वरुपी तोडगा काढला जात नाही. त्यामुळे नागरिकांना ये-जा करणे अवघड झाले असल्याचे वृत्त लोकमतने प्रकाशित करून नागरिकांच्या समस्येला वाचा फोडली. लोकमतने वृत्त प्रकाशित करताच वाळूज एमआयडीसी पोलीस प्रशासनाने सोमवारी दुपारी रस्त्यांवरील हातगाडीवाल्यांचे अतिक्रमण हटवून रहदारीसाठी रस्ता मोकळा केला. या कारवाईमुळे नागरिकांनी समाधान व्यक्त करून ‘लोकमत’चे आभार मानले आहेत.
ही कारवाई पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार लक्ष्मण उंबरे, फौजदार आरती जाधव, फौजदार सविता तांबे, फौजदार भास्कर खरात, सतीश जोगस, अशोक कांबळे, किरण जाधव, अशोक दाभाडे आदींनी केली.