शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
2
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
3
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
4
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
5
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
6
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
7
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
8
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
9
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
10
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
11
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
12
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
13
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
14
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
15
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
16
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
17
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
18
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
19
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
20
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे संपत्तीवर अतिक्रमण; कारवाई करणार

By admin | Updated: July 13, 2017 00:20 IST

हिंगोली : येथील रेल्वेस्थानक परिसरात रेल्वे संपत्तीवर अतिक्रमण करण्याचे प्रकार वाढले असले तरी अद्यापपर्यंत याची माहिती वरिष्ठांना दिलेली नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : येथील रेल्वेस्थानक परिसरात रेल्वे संपत्तीवर अतिक्रमण करण्याचे प्रकार वाढले असले तरी अद्यापपर्यंत याची माहिती वरिष्ठांना दिलेली नाही. परंतु रेल्वे हद्दीत केलेल्या अतिक्रमणधारकांवर रेल्वे विभागाकडून निश्चितच कडक कारवाई केली जाणार असल्याचे वरिष्ठ वाणिज्य विभागीय अधिकारी नेहा रत्नाकर यांनी बुधवारी रेल्वेस्थानकातील स्वच्छतेची पाहणी करताना दिली. हिंगोली रेल्वेस्थानकांची बुधवारी वरिष्ठ वाणिज्य विभागीय अधिकारी रत्नाकर यांनी रेल्वेस्थानकातील स्वच्छतेची अतिशय बारकाईने पाहणी केली. एवढेच काय तर स्थानकात असलेली जुनी कपाटेदेखील उघडून पाहिली. शिवाय रेल्वेस्थानक परिसरातील घाणीचीही पाहणी करुन स्वच्छ करण्याच्या सूचना रेल्वेस्टेशन मास्तरांना दिल्या. तसेच स्थानकावर असलेल्या कॅन्टिनच्या खाद्यपदार्थांची व थंडपेयासह दुधाची आणि आईस्क्रीमचीदेखील पाहणी करुन पिण्याच्या बॉटलचे १५ रुपये असे भावफलक मोठ्या अक्षरात लावावे तसेच जुने झालेले भावफलक काढून नवीन बसविल्यानंतर व्हॉट्स अ‍ॅपला टाकण्याच्या सूचनाही यावेळी दिल्या. तसेच प्रवाशांची जराही गैरसोय होणार नाही, याची काळजी घेण्याचे सांगितले. तर प्रवाशांच्या सेवेसाठी सुरु केलेल्या शौचालयाच्या पाहणीत स्वच्छताच दिसून न आल्याने रत्नाकार कामगारांवर भडकल्या. तसेच प्रतीक्षालयातील खिडक्यांचे फुटलेले काच आणि छताला लागलेले जाळेही काढण्याच्या सूचना दिल्या. तर सफाई कामगार महिलांशीही चर्चा केली. त्यांनी वेतन कमी असल्याचा मुद्दा सांगितल्यावर वेतनवाढीचा विचार केला जाईल, असेही सांगितले. तर प्रतीक्षालयातील खुर्च्याही वाढविण्यात येणार आहेत. तसेच रेल्वेही राष्ट्राची संपत्ती असल्याने या सेवेचा प्रवाशांनी उपयोग चांगल्या प्रकारे करावा. प्रवाशांची जराही गैरसोय टाळण्यासाठी रेल्वे प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. तसेच तिकिट काढूनच रेल्वेचा वापर करावा व रेल्वे परिसरात धूम्रपान टाळण्याचे आवाहन केले. पाहणीत दिलेल्या सूचनेमुळे स्थानकाचा खरोखरच कायापालट होण्याची चिन्हे दिसून येत आहेत.