२५ वर्षांपासूनचे अतिक्रमण हटले
By Admin | Updated: April 2, 2017 23:46 IST2017-04-02T23:44:48+5:302017-04-02T23:46:26+5:30
निलंगा :छत्रपती शिवाजी महाराज चौकात अतिक्रमण हटाव मोहिमेच्या तिसऱ्या दिवशी सर्व अतिक्रमणे काढण्यात आल्याने चौकाने मोकळा श्वास घेतला आहे़

२५ वर्षांपासूनचे अतिक्रमण हटले
निलंगा : गेल्या २५ वर्षांपासून अतिक्रमणाच्या विळख्यात सापडलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात अतिक्रमण हटाव मोहिमेच्या तिसऱ्या दिवशी सर्व अतिक्रमणे काढण्यात आल्याने चौकाने मोकळा श्वास घेतला आहे़
शिवाजी चौक ते हाडगा रोड, बँक कॉलनी रोड, आनंदमुनी चौक या भागात अतिक्रमण हटाव मोहिम सुरू आहे़ काही भागातील अतिक्रमणे भुईसपाट करण्यात आली आहे़ यात प्रथमत: दूध डेअरी, लातूर - बीदर रोडवर भाजी मंडई ही सर्वात मोठी समस्या होती़ आजपर्यंत १५ ते २० वेळा अतिक्रमण काढले़
मात्र पुन्हा दुसऱ्या दिवशी पुन्हा जैसे थे परिस्थिती व्हायची़ मात्र नूतन नगराध्यक्ष श्रीकांत शिंगाडे यांनी भाजी विक्रेत्यांना दूध डेअरी पाठीमागे पर्यायी जागा दिली व हे अतिक्रमण उठवले़ बँक कॉलनी रोडवरील उघड्यावरील मांस विक्रीची दुकाने व भाजीपाला विक्रेत्यांना काढण्यात आल्याने या मार्गावरील दुर्गंधी कमी झाल्याने नागरिकांतून स्वागत होत आहे़ याच रोडवर दर शुक्रवारी शेळ्यांचा बाजार भरत असल्याने पशुधन विकास कार्यालयात स्थलांतर केल्याने हा मार्ग मोकळा झाला़ तर शिवाजी चौकातील ट्रॅव्हल्स पॉर्इंट हलवून नाका नं़ १ वर हलविण्यात आला़
अतिक्रमण हटाव मोहिमेच्या तिसऱ्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज चौकात चहुबाजूने सुमारे ९०- १०० हातगाडे हलविण्यात आले असून त्यांना फेरीवाले झोनमध्ये परवानगी देणार असल्याचे नगराध्यक्षांनी सांगितले़