शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
3
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला पूर्ण; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
4
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
5
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
6
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
7
“अरविंद केजरीवाल महिलाविरोधी, PM मोदींवरील विश्वासामुळेच भाजपासोबत”: स्वाती मालीवाल
8
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
9
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
10
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
11
"आता हा दिग्दर्शन करणार, बघू काय दिवे लावतो...", रितेशने सांगितली दिग्दर्शनाच्या निर्णयामागची गोष्ट
12
"ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान
13
“छत्रपती शिवाजी महाराज अन् रामदास स्वामींचा कालखंड वेगळा, संदर्भ जोडू नका”: हर्षवर्धन सपकाळ
14
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
15
ई-कॉमर्सच्या युगात व्हा 'डिजिटल दुकानदार'; संपूर्ण देश बनू शकतो तुमचा ग्राहक! 'असे' बनू शकता Amazon-Flipkart वर सेलर
16
प्रेग्नंसी फोटो शेअर करत सुप्रिया पिळगावकरांनी दिला आठवणींना उजाळा, म्हणाल्या...
17
RBI च्या मोठ्या झटक्यानंतर Paytm च्या शेअरचं काय होणार? ब्रोकरेनं दिलं अवाक् करणारं टार्गेट
18
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
19
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
20
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
Daily Top 2Weekly Top 5

सिडकोच्या मोकळ्या भूखंडावर अतिक्रमण

By admin | Updated: October 7, 2014 00:45 IST

वाळूज महानगर : सिडकोच्या मोकळ्या भूखंडावर अनेकांनी अतिक्रमण केले असून, काहींनी तर येथे व्यवसाय थाटला आहे.

वाळूज महानगर : सिडकोच्या मोकळ्या भूखंडावर अनेकांनी अतिक्रमण केले असून, काहींनी तर येथे व्यवसाय थाटला आहे. मात्र, या अतिक्रमणांकडे सिडको प्रशासन डोळेझाक करीत असल्यामुळे दिवसेंदिवस यात भरच पडत आहे. प्रशासनाच्या भूमिकेमुळे नागरिकांमध्ये उलटसुलट चर्र्चेला ऊत आला आहे.सिडको प्रशासनाच्या मालकीच्या असलेल्या मोकळ्या भूखंडावर अनेक ठिकाणी अतिक्रमण करण्यात आले आहे. सिडकोच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून काहींनी तर पत्र्याचे शेड टाकून आपला व्यवसायही उभारला आहे. बजाजनगरातून सिडको वाळूज महानगरातील साईनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावरील नाल्याशेजारी असलेली झाडे तोडून जेसीबीच्या साह्याने साफसफाई करून त्या ठिकाणी व्यवसाय सुरू केला आहे. तसेच साईनगर व सिडको उद्यान या भागातून येणारे पावसाचे पाणी व सांडपाणी वाहून जाण्यासाठी बांधलेल्या सिमेंटच्या नालीवर मुरमाचा भर टाकून ३० ते ४० मीटर सांडपाण्याची नालीच बुजविली आहे. या जागेचा वापर वाहनतळासाठी करण्यात येत आहे. त्यामुळे वडगाव कोल्हाटी- तीसगाव रस्त्याकडून वाहून येणाऱ्या सांडपाण्याला अडथळा निर्माण झाला आहे. पाणी वाहून जाण्यासाठी पर्यायी मार्ग नसल्याने नालीतील सांडपाणी तुंबून मुख्य रस्त्यावर येण्याचा धोका निर्माण झाला आहे. मात्र, याकडे सिडको प्रशासन डोळेझाक करीत असून प्रशासनातीलच काही अधिकारी माहिती असूनही आर्थिक हितापोटी अतिक्रमणधारकांना अभय देत आहेत. विशेष म्हणजे या रस्त्यावरून सिडको अतिक्रमण हटाव पथक कायम येरझारा मारत असते. तरीही सिडकोच्या पथकाला हे अतिक्रमण दिसत नाही का, असा नागरिकांमधून प्रश्न उपस्थित केला जात आहे.