अतिक्रमण विभागाची मोठी कारवाई; शहागंज येथील २५ अतिक्रमणे हटवली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2023 14:41 IST2023-12-15T14:41:03+5:302023-12-15T14:41:31+5:30
महानगरपालिका अतिक्रमण हटाव विभागाकडून आज गांधी पुतळा, शहागंज व चमन परिसरात कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत एकूण २५ ...

अतिक्रमण विभागाची मोठी कारवाई; शहागंज येथील २५ अतिक्रमणे हटवली
महानगरपालिका अतिक्रमण हटाव विभागाकडून आज गांधी पुतळा, शहागंज व चमन परिसरात कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत एकूण २५ रस्त्यावरील अतिक्रमणधारकांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. या ठिकाणी काही ठिकाणी दुकानासमोरील रस्ता बाधित असलेले ओटे जमीनदोस्त करण्यात आले आहेत.
याबाबत वेळोवेळी नागरिकांनी व इतर लोकांनी वाहतुकीला अडथळा होत असल्याच्या तक्रारी पालिका प्रशासनाकडे केल्या होत्या. त्याचाच एक भाग म्हणून आज ही कारवाई करण्यात आली आहे. यापुढे जे लोक नियमांचे पालन करणार नाहीत अशा लोकांविरुद्ध लगेच वरिष्ठांच्या आदेशानुसार कारवाई केली जाईल असे मनपा अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी यांनी सांगितले आहे.तसेच इतर अतिक्रमण धारकांनी रस्त्यावरील आपले अतिक्रमण त्वरीत हटवून आपले होणारे नुकसान टाळावे असे प्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.