अतिक्रमणे हटविली

By Admin | Updated: March 10, 2017 00:22 IST2017-03-10T00:22:12+5:302017-03-10T00:22:58+5:30

जालना : जुना जालना भागातील इंदिरानगरातील प्रस्तावित डीपीरोडवरील अतिक्रमणे गुरूवारी नगर पालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने जमीनदोस्त केली.

Encroach was deleted | अतिक्रमणे हटविली

अतिक्रमणे हटविली

जालना : जुना जालना भागातील इंदिरानगरातील प्रस्तावित डीपीरोडवरील अतिक्रमणे गुरूवारी नगर पालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने जमीनदोस्त केली. ३० पेक्षा अधिक अतिक्रमणे हटविण्यात आली.
न्यायालयाच्या आदेशाने गतवर्षी अतिक्रमणे हटविण्यात आली होती. रस्ता मोकळा करण्यात आला होता. मात्र वर्षभरात काही नागरिकांनी पुन्हा अतिक्रमणे केली होती. अतिक्रमण काढून रस्ता मोकळा करण्याचे न्यायालयाचे आदेश असतानाही काहींनी पुन्हा अतिक्रमण केले. न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा भंग नको म्हणून नगर पालिकेने पुन्हा कारवाई करीत गुरूवारी अतिक्रमणे काढण्यात आली. दरम्यान दिलेल्या मार्किंगनुसार गतवर्षीच अतिक्रमणे काढण्यात आली होती. आता पुन्हा अतिक्रमण काढण्याची गरज नव्हती असे काही नागरिकांचे म्हणणे आहे. पालिकेने रस्त्याच्या मध्यापासून सत्तर ते शंभर फुटापर्यंत अतिक्रमण जमीनदोस्त केले आहे. नगर पालिकेने गुरूवारी सकाळीच अधिकारी व कर्मचारी मिळून दीडशे जणांच्या पथकाने इंदिरानगरा कारवाईला सुरूवात केली. पोलिसांचा बंदोबस्तही मोठा होता. या कारवाईला नागरिकांना किरकोळ विरोध वगळता मोहीम शांततेत पार पडली. ३० पेक्षा अधिक अतिक्रमणे पाडण्यात आली. गतवर्षी ५५ पेक्षा अधिक पक्क्या घरांचे बांधकाम पाडण्यात आले होते. उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन बारी, पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांच्यासह ४० पोलीस कर्मचारी बंदोबस्तावर उपस्थित होते.

Web Title: Encroach was deleted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.