शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
6
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
7
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
8
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
9
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
10
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
11
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
12
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
13
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
14
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
17
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
18
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
20
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप

परदेशी कंपन्यांना सवलतींपेक्षा स्थानिकांना प्रोत्साहन द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2018 12:25 AM

परदेशी कंपन्यांना विविध सवलती आणि कर्जपुरवठा करण्यापेक्षा स्थानिक उद्योजकांना उद्योग सुरूकरण्यासाठी प्रोत्साहन द्या. बंद पडणाऱ्या उद्योगांना संजीवनी दिली गेली तरच औद्योगिक क्षेत्र टिकेल, असा सूर उद्योजकांतून उमटला.

ठळक मुद्देउद्योजकांचा सूर : नवीन औद्योगिक धोरणावरील चर्चासत्रात उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यासमोर मांडल्या व्यथा

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : परदेशी कंपन्यांना विविध सवलती आणि कर्जपुरवठा करण्यापेक्षा स्थानिक उद्योजकांना उद्योग सुरूकरण्यासाठी प्रोत्साहन द्या. बंद पडणाऱ्या उद्योगांना संजीवनी दिली गेली तरच औद्योगिक क्षेत्र टिकेल, असा सूर उद्योजकांतून उमटला.शहरातील एका हॉटेलमध्ये शुक्रवारी आयोजित महाराष्ट्र नवीन औद्योगिक धोरण या विषयावरील चर्चासत्रात सहभागी झालेल्या उद्योजकांनी आपल्या व्यथा मांडल्या.राज्य शासनाच्या उद्योग विभागातर्फे नवीन औद्योगिक धोरण तयार करण्यासाठी उद्योजकांची मते जाणून घेतली जात आहेत. यानुसार औरंगाबाद शहरात शुक्रवारी सकाळी चर्चासत्र घेण्यात आले. याप्रसंगी उद्योग आणि खाणमंत्री सुभाष देसाई, अतिरिक्त मुख्य सचिव सतीश गवई, विकास आयुक्त हर्षदीप कांबळे, खा. चंद्रकांत खैरे, आ. संजय शिरसाट, विनोद घोसाळकर, संजय देवगावकर उपस्थित होते.उद्योजकांच्या मुद्द्यांचा नवीन औद्योगिक धोरणात समावेश व्हावा, यादृष्टीने उद्योग खाते काम करीत आहे. सप्टेंबरमध्ये पूर्ण होणारे हे धोरण सर्वसमावेशक उद्योगस्नेही असेच असेल, अशी ग्वाही उद्योग व खाणमंत्री सुभाष देसाई यांनी यावेळी दिली. २०१३-१८ या काळात ८ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक झाली असून, २० लाख रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट होते. ते २८ लाख रोजगारांवर गेले आहे. रोजगार वाढले, मात्र उत्पादनात १२ टक्क्यांवरून ७ टक्क्यांवर घसरण झाल्याचे त्यांनी कबूल केले. लघुउद्योगांना सोयी-सवलती देण्यासाठी धोरणात भर दिला जाईल. आजारी पडणाºया उद्योगांना मदत करण्याचे ठरविले पाहिजे. गुंतवणूक आणि रोजगार वाढविणे हा मुख्य हेतू आहे. जॉबलेस उद्योग अर्थ नाही. मुला- मुलींना रोजगार मिळावा, हा नवीन धोरण करण्यामागचा मुख्य उद्देश आहे. उद्योजकांच्या सूचना लक्षात घेऊन अधिकारी नवीन औद्योगिक धोरणात याचा समावेश करण्याचा प्रयत्न करतील, असे देसाई यांनी स्पष्ट केले.खा. चंद्रकांत खैरे म्हणाले की, डीएमआयसीमध्ये कच-यासाठी राखीव जागा ठेवायला हवी. विदेशी कंपन्या येत आहेत. यांचे टेंडर हे भूमिपुत्रांना दिले गेले पाहिजे. उद्योगांना एमएसएमईला उद्योग कर्ज दिले पाहिजे. स्मॉल स्केल इंडस्ट्रीला प्रोत्साहन दिले गेले पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.महाराष्ट्राच्या उद्योग धोरणात काय बदल हवेत तसेच नवीन धोरण कसे असावे, याचा विचार करण्यात येईल. महाराष्ट्राच्या उद्योगवाढीसाठी उद्योजकांचे स्थान महत्त्वाचे आहे. इलेक्ट्रिकल व्हेईकल पॉलिसी औरंगाबादसाठी महत्त्वाची आहे. महिला उद्योजकांसाठी धोरण तयार केले. भिवंडी येथे लॉजिस्टिक हब, इलेक्ट्रॉनिक पॉलिसी आदी बाबींचा विचार सुरू असल्याचे आयुक्त हर्षदीप कांबळे यांनी प्रास्ताविकात सांगितले.

टॅग्स :businessव्यवसायAurangabadऔरंगाबादSubhash Desaiसुभाष देसाईMIDCएमआयडीसी