शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती संभाजीनगरातील एन्काउंटर, तपासाची सूत्रे सीआयडीच्या हाती; १ तास चालला पंचनामा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 12:20 IST

सीआयडीच्या पथकाने सहायक निरीक्षक रवी गच्चे यांच्याकडून समजून घेतला एन्काऊंटरचा घटनाक्रम

छत्रपती संभाजीनगर / वाळूज : बजाजनगरमध्ये आर. एल. सेक्टरमधील उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरावर टाकलेल्या दरोड्याचा मुख्य सूत्रधार अमोल बाबूराव खोतकर (वय ३४, रा. पडेगाव) याच्या सोमवारी मध्यरात्रीच्या एन्काऊंटरने, शहरासह गुन्हेगारी जग हादरवून गेले आहे. मंगळवारी सायंकाळीच यातील महत्त्वाच्या साक्षीदारांचे न्यायालयात जबाब नोंदविल्यानंतर सीआयडीने एफआयआरसह महत्त्वाची कागदपत्रे हस्तगत केली. तसेच तपासाची सूत्रे हाती घेतली. बुधवारी जवळपास एक तास त्यांच्या पथकाने घटनास्थळाचा पंचनामा करून हॉटेलही सील केले.

१५ मे रोजी लड्डा यांच्या बंगल्यात मध्यरात्री दोन ते चार वाजेदरम्यान सहा सशस्त्र दरोडेखोरांनी दरोडा टाकला होता. साडेपाच किलो सोन्याचे दागिने, ३२ किलो चांदी, ७० हजार रुपये रोख रक्कम आणि एक मोबाइल लुटला होता. गुन्हे शाखा व एमआयडीसी वाळूज पोलिसांनी जवळपास अकरा दिवस तपास करून अमोलसह याेगेश सुभाष हाजबे (३१, रा. वडगाव कोल्हाटी), सय्यद अजहरोद्दीन सय्यद कबीरोद्दीन (३७, रा. रांजणगाव शेणपुंजी), महेंद्र माधव बिडवे (३८, रा. साजापूर), सुरेश ऊर्फ सूर्यकांत रामकिसन गंगणे (४५, रा. अंबाजोगाई), सोहेल जलील शेख (२२, रा. अंबाजोगाई) यांना निष्पन्न केले. अमोलच्या एन्काऊंटरच्या दोन दिवस आधीच अन्य पाचही दरोडेखोर पोलिसांच्या ताब्यात होते. सोमवारी मध्यरात्री अमोल साजापूर येथील साई लाॅजिंग येथे आल्याचे कळताच पोलिसांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, अमोलने पोलिसांवर गोळी झाडली. या चकमकीत पोलिसांनी झाडलेल्या गोळीत त्याचा मृत्यू झाला.

दुपारी १२ वाजता अंत्यसंस्कारअमोलला जाणीवपूर्वक मारल्याचा आरोप करीत कुटुंबाने पोलिसांच्या एन्काऊंटरवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मंगळवारी रात्री उशिरा पोलिस बंदोबस्तात त्याच्या मृतदेहाचे विच्छेदन करण्यात आले. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर बुधवारी कुटुंबाने त्याचा मृतदेह ताब्यात घेतला. दुपारी १२ वाजता पोलिस बंदोबस्तात मिटमिटा परिसरात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

एक तास चालला सीआयडीचा पंचनामाबुधवारी दुपारी १२ वाजता सीआयडीचे एक अधिकारी व पाच कर्मचारी घटनास्थळावर दाखल झाले. जवळपास एक तास त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. शिवाय, अमोल व याेगेश चालवीत असलेले हॉटेलदेखील सील केले.

गच्चे यांच्याकडून समजून घेतला घटनाक्रमगुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक रवी गच्चे यांनी त्यांच्या शासकीय पिस्तुलातून एन्काऊंटर केले. बुधवारी पंचनाम्यादरम्यान सीआयडीच्या पथकाने त्यांच्याकडून सर्व घटनाक्रम समजून घेत नोंदी केल्या. अमोल नेमका कुठे होता, कार कुठल्या दिशेला उभी होती, पोलिसांनी कुठून थांबण्याचा इशारा केला, गोळी किती अंतरावरून झाडली गेली, या सर्व प्रश्नांची उत्तरे सीआयडीने गच्चे यांच्याकडून घेतली. दरम्यान, अमोलने पथकावर कार घातल्यानंतर अंमलदार मनोहर गिते यांच्या पायाला इजा झाली होती. बुधवारी त्यांची रुग्णालयातून सुटी करण्यात आली.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरCrime Newsगुन्हेगारीRobberyचोरी