शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

एन्काउंटरमुळे ५ किलो सोने, ३२ किलो चांदीचे गूढ कायम, मृत अमाेलने सोने दिले कोणाकडे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 12:42 IST

परराज्यात सोने ठेवल्याचा पोलिसांना संशय; पाच दरोडेखोरांना १४ दिवसांची पोलिस कोठडी

छत्रपती संभाजीनगर : उद्योजक संतोष लड्डा यांच्याकडील दरोड्यात ५.५ किलो सोन्याचे दागिने व ३२ किलो चांदी लुटली गेली. त्यापैकी केवळ २० तोळे सोनेच आतापर्यंत पोलिसांना मिळाले आहे. दरोड्याचा मुख्य सूत्रधार अमोल खोतकर याच्या एन्काउंटरमुळे मात्र आता या सोन्याचे गूढ वाढले आहे. त्याने ते सोने कोणाकडे दिले, हे तपासणे पोलिसांसमाेर आव्हान बनले आहे.

अमोलच्या एन्काउंटरमुळे दोन दिवसांपासून पोलिसांच्या ताब्यात असलेल्या त्याच्या पाचही साथीदारांना मंगळवारी पहाटे ४:३० वाजता अटक दाखवण्यात आली. गुन्हे शाखेने त्यांना दुपारी २:३० वाजता न्यायालयात हजर केले. जवळपास २५ मिनिटे सुनावणीत न्यायालयाने १४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. पाच जणांकडून पोलिसांना केवळ २० तोळे सोने मिळवता आले.

लड्डांची माहिती देणारा कोण?न्यायालयात बाजू मांडताना दरोडेखोरांनी बहुतांश सोने परराज्यात ठेवल्याचे किंवा विकल्याचा संशय व्यक्त केला. शिवाय, माहीतगाराशिवाय हा दरोडा अशक्य असल्याने अमाेल व योगेशला लड्डा यांची माहिती कोणी दिली, याचा अद्यापही पोलिसांनी उलगडा केला नाही. त्याचा शोध घेणे बाकी असल्याचे पोलिसांनी न्यायालयाला सांगितले.

रात्री उशिरापर्यंत शवविच्छेदन सुरूदरम्यान, घाटी रुग्णालयात रात्री ८ वाजता सुरू झालेल्या अमोलच्या मृतदेहाचे शवविच्छेदन रात्री उशिरापर्यंत सुरू होते. घाटी रुग्णालयातदेखील एसआयडी, सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी धाव घेतली होती. न्यायदंडाधिकाऱ्यांच्या उपस्थित पंचनाम्यानंतर शवविच्छेदनास सुरुवात करण्यात आली.

जवळच्याच व्यक्तीकडे दिल्याचा संशयअमोलने सोने कुठे ठेवले, हा प्रश्न मंगळवारी अनुत्तरित राहिला. जवळच्याच व्यक्तीकडे ते ठेवल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यासाठी त्याच्या मैत्रिणीची बुधवारी चौकशी केली जाणार आहे.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसRobberyचोरी