जनता मार्केट रिकामे करा- जी़श्रीकांत
By Admin | Updated: June 27, 2014 00:15 IST2014-06-26T23:42:00+5:302014-06-27T00:15:23+5:30
नांदेड : शिवाजीनगर येथील जनता मार्केटची इमारत धोकादायक असल्याने तत्काळ पाडावी, असा अहवाल औरंगाबादच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाने दिला

जनता मार्केट रिकामे करा- जी़श्रीकांत
नांदेड : शिवाजीनगर येथील जनता मार्केटची इमारत धोकादायक असल्याने तत्काळ पाडावी, असा अहवाल औरंगाबादच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाने दिला असून संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी गाळेधारकांनी आपला व्यवसाय स्थलांरित करून संकुल रिकामे करावे, अशा सूचना आयुक्त जी़ श्रीकांत यांनी केल्या़
महापालिकेत गुरूवारी गाळेधारकांसोबत चर्चा करण्यासाठी बैठकीचे आयोजन केले होते़ यावेळी आयुक्त म्हणाले, जनता मार्केट संकुलातील व्यापाऱ्यांनी आपले स्थलांतर करावे़ संबधित गाळेधारकांना त्यांच्या व्यवसायासाठी तात्पुरती जागा उपलब्ध करून दिली जाईल़ महापालिकेच्या वतीने जनता मार्केट नव्याने उभारून गाळेधारकांच्या सहभागाने पुनर्वसनाची योजना तयार केली जाईल़
जनता मार्केट इमारतीच्या सुरक्षिततेसंबधात औरंगाबादच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाने केलेल्या संरचनात्मक तपासणीचा अहवाल महापालिकेस प्राप्त झाला असून त्याची माहिती गाळेधारकांना देण्यात आली़ शिवाजीनगर जनता मार्केट पाडल्यानंतर बीओटी तत्वावर इमारत उभी करण्याचा मनपाचा कोणताही निर्णय नाही़ या जागेत आधुनिक सुविधांसह नवीन भव्य व्यापारी संकुल उभारण्यात येईल़ नव्या संकुलात पूर्वीच्या गाळेधारकांना पुन्हा नव्याने जागा दिली जाईल़ एकही गाळेधारक यापासून वंचित राहणार नाही, असेही आयुक्त म्हणाले़ नव्या संकुलासाठी लागणाऱ्या खर्चाचा भार गाळेधारकांना उचलावा लागेल़ गाळेधारकांना दुकान सोडायचे झाल्यास दिलेली मूळ अनामत परत करणे, ३० वर्षाचा करार करणे, गाळा विकण्याचे हक्क धारकास देवून त्यातून आलेली २५ टक्के रक्कम मनपाकडे हस्तांतरीत करणे आदींवर चर्चा करण्यात आली़ (प्रतिनिधी)