आयुक्तालयासाठी उदगीरकरांचे बळ
By Admin | Updated: January 13, 2015 00:13 IST2015-01-13T00:00:42+5:302015-01-13T00:13:20+5:30
उदगीर : आयुक्तालय लातूरलाच व्हावे, अशी मागणी जोर धरु लागली आहे़ त्यासाठी आंदोलन उभारण्याची तयारी लातुरात सुरु असताना त्यांना उदगीरकरांनीही आता बळ दिले आहे

आयुक्तालयासाठी उदगीरकरांचे बळ
उदगीर : आयुक्तालय लातूरलाच व्हावे, अशी मागणी जोर धरु लागली आहे़ त्यासाठी आंदोलन उभारण्याची तयारी लातुरात सुरु असताना त्यांना उदगीरकरांनीही आता बळ दिले आहे सोमवारी येथील वकील संघाने या मागणीसाठी लाल फिती लावून काम केले़
लातुरात आयुक्तालयासाठी इमारत तयार करुनही येथे प्रस्तावित कार्यालय नांदेडला मंजूर करण्यात आले़ त्यामुळे लातूरकरांनी सुरु केलेल्या चळवळीस आता उदगीरकरांनीही पाठिंबा दर्शविला आहे़ सोमवारी उदगीरच्या वकील संघाने आयुक्तालयाच्या मागणीसाठी व उभ्या राहत असलेल्या आंदोलनास पाठिंबा दर्शविण्यासाठी दिवसभर लाल फिती लावून कामकाज केले़ यावेळी संघाचे अध्यक्ष अॅड़दत्ता पाटील, अॅड़एस़जी़ मरलापल्ले, अॅड़एस़पी़ माने, अॅडक़े़एल़ टाकळे, अॅड़एस़जी़ पांडे, अॅड़जयश्री पाटील, अॅड़सचिन कुलकर्णी, अॅड़बालाजी आदेप्पा यांच्यासह इतर विधिज्ञ उपस्थित होते़ (वार्ताहर)