‘स्मित’च्या माध्यमातून शेतकर्‍यांचे प्रबोधन

By Admin | Updated: June 1, 2014 00:30 IST2014-06-01T00:07:15+5:302014-06-01T00:30:01+5:30

अंबाजोगाई: निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकर्‍यांवर सातत्याने होणारे आघात. कोलमडणारी आर्थिक स्थिती. आत्महत्या यामुळे शेतकर्‍यांच्या चेहर्‍यावरचे ‘स्मित’ हरवले आहे.

Empowerment of farmers through 'Smile' | ‘स्मित’च्या माध्यमातून शेतकर्‍यांचे प्रबोधन

‘स्मित’च्या माध्यमातून शेतकर्‍यांचे प्रबोधन

 अंबाजोगाई: निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकर्‍यांवर सातत्याने होणारे आघात. यामुळे शेतकर्‍यांची कोलमडणारी आर्थिक स्थिती. परिणामी, कर्जबाजारीपणमुळे होणार्‍या आत्महत्या यामुळे शेतकर्‍यांच्या चेहर्‍यावरचे ‘स्मित’ हरवले आहे. हरवलेले हे स्मित पुन्हा त्यांच्या चेहर्‍यावर दिसावे यासाठी ज्ञानप्रबोधिनीच्या वतीने शेतकर्‍यांसाठी दिलासादायी उपक्रमांची अंमलबजावणी अंबाजोगाई तालुक्यातील १० खेड्यांमध्ये सुरू आहे. गेल्या अनेक वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकर्‍यांची आर्थिक स्थिती पूर्णत: खालावली आहे. वाढती महागाई, रासायनिक खतांच्या वाढत्या किमती, बियाणांच्या वाढत्या किमती, तणनाशक, कीटकनाशक यांच्या किमती गगनाला भिडलेल्या असल्याने सामान्य शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. या स्थितीवर मात करण्यासाठी व शेतकर्‍यांना कमी खर्चात जास्त उत्पादन कसे काढता येईल? याबाबतच्या अनेक उपाययोजना तज्ञ शास्त्रज्ञ व कृषितज्ज्ञ यांच्या साह्याने आखण्यात आल्या आहेत. यात प्रामुख्याने पाण्याचे नियोजन, बियाणांची उपलब्धता, खरीपपूर्व शेतीचे नियोजन, मिश्र पिके घेणे, घरच्या बियाणांची उगवण क्षमता, तणनाशक व अंतर्गत मशागत, पेरणीपूर्व किडीचा बंदोबस्त, मनुष्यबळ व यंत्रशेतीचे नियोजन, कूपनलिकांचे पुनर्भरण अशा महत्त्वपूर्ण विषयांवर गावोगावी जनजागृती सुरू असून होणार्‍या शेतकरी मेळाव्यास डॉ. गुट्टे, दीपक देशपांडे यांच्यासह ज्ञानप्रबोधिनीचे समन्वयक प्रसाद चिक्षे हा उपक्रम राबवित आहेत. या उपक्रमाचा शेतकर्‍यांना मोठ्या प्रमाणात लाभ होत आहे. हा उपक्रम घेतल्याने शेतकर्‍यांमधून समाधान व्यक्त होत आहे. (वार्ताहर) शेतकर्‍यांमध्ये समाधान १० खेड्यांमधील शेतकर्‍यांशी साधला थेट संवाद. तज्ज्ञ व्यक्तींंनी दिले शेतीविषयक मार्गदर्शन. शेतकर्‍यांसाठी मार्गदर्शन महत्त्वाचे. शेतकर्‍यांमधून होतेय समाधान व्यक्त. पावसाळ्यापूर्वी दिलेल्या प्रशिक्षणाचा होणार फायदा.

Web Title: Empowerment of farmers through 'Smile'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.