दोघांना सक्तमजुरी
By Admin | Updated: June 18, 2014 01:29 IST2014-06-18T01:18:12+5:302014-06-18T01:29:07+5:30
मुखेड : तालुक्यातील गोणेगाव येथील सार्वजनिक वाचनालयात गैरव्यवहार केल्याच्या आरोपाखाली न्यायालयाने दोघांना प्रत्येकी तीन वर्ष सक्तमजुरीची शिक्षा व प्रत्येकी एक हजार रुपये दंड सुनावला.
दोघांना सक्तमजुरी
मुखेड : तालुक्यातील गोणेगाव येथील सार्वजनिक वाचनालयात गैरव्यवहार केल्याच्या आरोपाखाली न्यायालयाने दोघांना प्रत्येकी तीन वर्ष सक्तमजुरीची शिक्षा व प्रत्येकी एक हजार रुपये दंड सुनावला.
गोळेगाव ता. मुखेड येथे केरबाजी सार्वजनिक वाचनालयात गैरव्यवहार झाला आहे. या वाचनालयाचे अध्यक्ष म्हणून संतुकराव नागरवाड तर संजय डोरनाळे ग्रंथपाल व भाऊराव डोरनाळे सदस्य आहेत. वाचनालयाच्या अनुदानापोटी शासनाने ५८ हजार ६५० रुपयांचा धनादेश दिला होता, मात्र ग्रंथपाल व सदस्याने वाचनालयाच्या अध्यक्षांच्या नावने खाते उघडून धनादेश जमा करुन रक्कम उचलली.
याप्रकरणी वाचनालयाचे अध्यक्ष संतुकराव नागरवाड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा नोंदविला व प्रकरण न्यायालयात पाठविले. याप्रकरणात सरकार पक्षाच्या वतीने ७ साक्षीदार तपासण्यात आले. न्या. विनोद पाटील यांनी दोघांनाही वरीलप्रमाणे शिक्षा सुनावली. याप्रकरणात सरकारची बाजू अॅड. आमेर काझी यांनी तर सहाय्यक म्हणून अॅड. अस्लम शेख यांनी काम पाहिले.(वार्ताहर)