रोजगार हमी योजनेची ६,७४४ कामे प्रगतिपथावर

By Admin | Updated: April 24, 2016 00:15 IST2016-04-24T00:03:38+5:302016-04-24T00:15:23+5:30

औरंगाबाद : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत मराठवाडा विभागातील आठही जिल्ह्यांत एकूण ६,७४४ कामे प्रगतिपथावर असून, शेल्फवरील एकूण कामे १,१०,२९४ इतकी आहेत

Employment Guarantee Scheme 6,744 works in progress | रोजगार हमी योजनेची ६,७४४ कामे प्रगतिपथावर

रोजगार हमी योजनेची ६,७४४ कामे प्रगतिपथावर

औरंगाबाद : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत मराठवाडा विभागातील आठही जिल्ह्यांत ७ एप्रिल ते १३ एप्रिल या कालावधीत एकूण ६,७४४ कामे प्रगतिपथावर असून, शेल्फवरील एकूण कामे १,१०,२९४ इतकी आहेत.
परभणी जिल्ह्यात एकूण ८०९ कामे प्रगतिपथावर असून, १४,६४४ मजूर उपस्थिती असून, शेल्फवरील एकूण कामे ७,७१५ आहेत. हिंगोली जिल्ह्यात एकूण २५४ कामे प्रगतिपथावर असून, ९,५०७ मजूर उपस्थिती आहे तर शेल्फवरील एकूण कामे ३,५९५ आहेत.
बीड जिल्ह्यात एकूण १,३०६ कामे प्रगतिपथावर असून, १३,४४६ मजूर उपस्थिती आहे. तर शेल्फवरील एकूण कामे ३,५१४ इतकी आहेत. नांदेड जिल्ह्यात एकूण ७८७ कामे प्रगतिपथावर असून, ८,९१० मजूर उपस्थिती आहे. तर शेल्फवरील एकूण कामे २०,४८९ इतकी आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात एकूण १००१ कामे प्रगतिपथावर असून, १५,५७७ इतकी मजूर उपस्थिती आहे. शेल्फवरील एकू ण कामे ९,५३३ इतकी आहेत.
लातूर जिल्ह्यात एकूण १,५२५ कामे प्रगतिपथावर असून, १६,१५७ इतकी मजूर उपस्थिती आहे, तर शेल्फवरील एकूण कामे २२,६४५ इतकी आहे.

Web Title: Employment Guarantee Scheme 6,744 works in progress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.