‘नोकरदारांची’ही ठरली अवैध मते
By Admin | Updated: October 21, 2014 00:57 IST2014-10-21T00:32:02+5:302014-10-21T00:57:15+5:30
बाळासाहेब जाधव ,लातूर लातूर जिल्ह्यातील नियमित मतदानाबरोबरच पोस्टल पद्धतीने मतदान करणाऱ्या नोकरदार व्यक्तींचा मोठ्या प्रमाणात भरणा आहे़ त्यांना निवडणुकीच्या कालावधीत मतदान केंद्रावरील कामाचा

‘नोकरदारांची’ही ठरली अवैध मते
बाळासाहेब जाधव ,लातूर
लातूर जिल्ह्यातील नियमित मतदानाबरोबरच पोस्टल पद्धतीने मतदान करणाऱ्या नोकरदार व्यक्तींचा मोठ्या प्रमाणात भरणा आहे़ त्यांना निवडणुकीच्या कालावधीत मतदान केंद्रावरील कामाचा ताण असल्यामुळे त्यांच्यासाठी पोस्टल मतदानाची सोय करण्यात आली होती़ यातही ३५९ मते अवैध ठरली असल्याने एकूण मतदानात काही प्रमाणात घट झाली आहे़
लातूर जिल्ह्यात येणाऱ्या लातूर शहर, लातूर ग्रामीण, अहमदपूर, निलंगा, औसा, उदगीर या सहा विधानसभा मतदार संघामध्ये एकूण मतदानापैकी ६ हजार ४०५ पोस्टल मतदार आहेत़ यापैकी ६ हजार ३४ मतदारांनी केलेले मतदान वैध ठरले आहे़ तर ३५९ मतदारांनी पाठविलेल्या मतपत्रीकामध्ये प्रतिज्ञापत्राचा अभाव, नमुना १३ नसणे, गॅझेटीअरची स्वाक्षरी नसणे आदींचा अभाव असल्यामुळे ही मते अवैध ठरली आहेत़
निवडणूक विभागाने निवडणुका जाहीर झाल्यानंतर मतदानाच्या टक्केवारीत वाढ व्हावी या दृष्टीकोनातून विविध शाळा, महाविद्यालये, विविधि ठिकाणी मतदान जनजागृती संबंधी अनेक कार्यक्रम घेण्यात आली़ तसेच अनेक ठिकाणी भारुडामार्फत जनजागृतीही केली़ अनेक ठिकाणी जनजागृती प्रबोधनासाठी पोस्टर्सही शासकीय निमशासकीय कार्यालयासमोर लावण्यात आले. शासकीय कार्यालयांनाही विविध कामासाठी कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना मतदान जनजागृतीबाबत शासनाने राबविलेल्या विविध उपक्रमाची माहिती देण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधीत शासकीय अधिकाऱ्याला दिले़ त्यामुळे मतदानाच्या टक्केवारीत मोठी वाढ झाली़ नवीन नोंदणीमुळे एकूण मतदारात १०५०० मतदारांची भर पडली़ त्यामुळे मतदार नोंदणीचा एकूण आकडा १७ लाख १३ हजार ९२३ वर गेला आहे़
या मतदारापैकी पोस्टल मतदारामध्ये ६४०५ मतदारांची नोंद आहे़ या मतदारांमध्ये शासकीय- निमशासकीय नोकरदारांचा अंतर्भाव आहे़ तरीही यातील ५५९ जणांना पोस्टल मतदानाचा हक्क व्यवस्थीतपणे बजावता आला नाही़ परिणामी पोस्टल मतपत्रीका भरण्यातील त्रुटीमुळे औसा विधानसभा मतदार संघातील ६, लातूर ग्रामीण मतदार संघातील ३२, लातूर शहर मतदार संघातील १०, अहमदपूर मतदार संघातील ८०, उदगीर मंतदार संघातील ९६ तर निलंगा मतदार संघातील १३५ अशा एकूण ५५९ मतदारांची मते अवैध ठरली आहेत़ तर १२ जणांनी मतदान यंत्रावर ‘नोटा’ला मतदान केले आहे़ इलेक्ट्रॉनिक मशिनमुळे अवैध मतदानाला चाप बसला असला तरी पोस्टल मतदानामध्ये नोकरदारांनी बजावलेल्या हक्कामध्ये पोस्टल मतपत्रिका भरण्यातील त्रुटीमुळे अवैध मतदारात भर पडली आहे.