शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सोने स्वस्ताईने आनंद, पण महागाईवर भाष्य नसल्याने महिलांमध्ये संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2024 11:49 IST

आयकराच्या मर्यादेत वाढ न झाल्याने नोकरदार नाराज, तर लघु व सूक्ष्म उद्योगांसाठी दिलासा

छत्रपती संभाजीनगर : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये आयकराच्या मर्यादेत पाच लाखांपर्यंतची वाढ न झाल्याने छत्रपती संभाजीनगरातील नोकरदारांनी नाराजी व्यक्त केली. दुसरीकडे सोन्यावरील सीमा शुल्क कमी केल्याने सोन्याचे दर कमी झाल्याने महिलावर्ग खुश आहे. याबरोबरच हा अर्थसंकल्प लघु व सूक्ष्म उद्योगांसाठी दिलासा देणारा असल्याने त्याचा महाराष्ट्रासह छत्रपती संभाजीनगरच्या औद्योगिक क्षेत्रासाठी लाभ होईल, याची येथील उद्योजकांना आशा आहे.

देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय अर्थसंकल्प मांडल्यानंतर शहरातील अनेक जाणकार नागरिक, व्यापारी व उद्योग संघटनांचे प्रतिनिधी, तसेच अर्थशास्त्राचे अभ्यासक- विद्यार्थी, सीए आदींसह काही कुटुंबांमध्येही वृत्तवाहिन्यांवर अर्थसंकल्प पाहण्यात आला. आपापल्या क्षेत्रावर त्याचा काय परिणाम झाला, अर्थसंकल्पाकडून काय अपेक्षा होत्या आणि त्या अपेक्षांची पूर्ती किती झाली, यासंबंधी जाणकारांनी मते व्यक्त केली.

नोकरदार वर्गच खऱ्या अर्थाने उत्पन्न कर भरतात. त्यामुळे केंद्र शासनाने अर्थसंकल्पात या वर्गासाठी सवलत देण्याऐवजी दरवर्षी त्यात काहीना काही वाढ करण्याचा निर्णय योग्य नाही, अशी प्रतिक्रिया नोकरी करणारे व कर भरणारे स्वप्नील चव्हाण यांनी व्यक्त केली आहे. पाच लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त व्हायला हवे होते. स्लॅबनिहाय उत्पन्न आणि कर भरणा करताना करदात्यांची तारांबळ होते. गुंतवणुकीचे पर्याय जरी असले तरी त्याचे परतावे काही प्रमाणातच मिळतात. नियमित कर भरणाऱ्यांना इन्सेन्टिव्ह देण्याचा विचारही शासनाने केला पाहिजे, अशी अपेक्षाही चव्हाण यांनी व्यक्त केली.

देशात १०० ठिकाणी औद्योगिक पार्क उभारण्याचा निर्णय स्वागतार्ह असल्याची प्रतिक्रिया स्थानिक उद्योजकांनी व्यक्त केली. उद्योगांना अत्यंत कमी दराने कर्ज देणाऱ्या सिडबी बँकेच्या २४ शाखा उघडण्याचा निर्णय चांगला आहे, याचा लाभ छत्रपती संभाजीनगरला मिळाला पाहिजे, अशी उद्योजकांना अपेक्षा आहे. महिला उद्योजकांना स्टॅम्प ड्यूटीमध्ये सूट दिल्यामुळे औद्योगिक क्षेत्रातील महिलांचा सहभाग वाढेल, अशी अपेक्षाही आहे. शहरातील तरुणांना मात्र या अर्थसंकल्पातून त्यांच्या हाती काही लागेल, याबद्दल शंका आहे, तर दुसरीकडे जिल्हाभरातील २० हजारांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना थेट फायदा होण्याची शक्यता अधिकारी व्यक्त करत आहेत.

महिलांकडून नाराजीइंधन, तसेच गॅसच्या किमती याबाबत अर्थमंत्र्यांनी काहीच दिलासा न दिल्याने नाराजी व्यक्त केली. महागाईबाबतही केंद्र सरकारने अर्थसंकल्पात कोणताच दिलासा दिला नाही, याबद्दल मध्यमवर्गीय कुटुंबातील भाग्यश्री यादव यांनी संतापजनक प्रतिक्रिया दिली.

टॅग्स :Budgetअर्थसंकल्प 2024AurangabadऔरंगाबादWomenमहिलाInflationमहागाईGoldसोनं