शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक: अनुदान विभागातील कर्मचाऱ्याने नुकसान भरपाईचे पैसे स्व:ताच्या वडिलांच्या नावावर वळवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2019 15:28 IST

पैठण तालुक्यातसुद्धा तलाठी व महसूल कर्मचाऱ्यांनी गावा-गावात जाऊन पंचनामे करून अहवाल तहसील कार्यालयात सादर केला होता.

औरंगाबाद: ऑक्टोबर मध्ये झालेल्या अवकाळी पाऊसामुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान लक्षात घेत सरकारकडून खरीप पिके व फळबाग यांचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात आली आहे. मात्र पैठणमध्ये तहसील कार्यालयात अनुदान विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने चक्क नुकसान भरपाईच्या यादीत स्वता:च्या वडिलांचे नाव टाकून अनुदानाची रक्कम वळवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे महसूल खात्यात खळबळ उडाली आहे.

अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याने सरकराने पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पैठण तालुक्यातसुद्धा तलाठी व महसूल कर्मचाऱ्यांनी गावा-गावात जाऊन पंचनामे करून अहवाल तहसील कार्यालयात सादर केला होता. मात्र याच कार्यालयात खाजगी कंपनीमार्फत काम करणाऱ्या प्रदीप नेहाले याने यादीत फेरफार करीत लाभार्थींना डावलून इतर लोकांच्या नावाने अनुदान वळवल्याचा आरोप करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे नेहाले याने स्वता:च्या नातेवाईक आणि वडिलांच्या नावाने सुद्धा अनुदान लाटले असल्याचा आरोप करण्यात येत आहे. थेरगाव येथे नेहाले याची वडिलांच्या नावे 1 हेक्टर 65 आर जमीन असून त्यापैकी 0.60 क्षेत्रावर मोसंबीची लागवड असल्याचा अहवाल तलाठी यांच्याकडून देण्यात आला होता. मात्र त्याने यादीत फेरफार करून स्वता:च्या वडिलांच्या नावे 1 हेक्टरवर मोसंबीच पिक लावले असल्याचे दाखवून 18000 रुपयाचे अनुदान लाटले असल्याचा आरोप शेतकरी नेते जयाजी सूर्यवंशी यांनी केला आहे.

सखोल चौकशी करण्याची मागणीशेतकरी आधीच संकटात असताना त्याच्या हक्काच्या अनुदानावर सुद्धा शासकीय कार्यालयात काम करणारे कर्मचारी डल्ला मारत आहे. विशेष म्हणजे प्रदीप नेहाले याने तालुक्यातील अनेक बोगस शेतकऱ्यांच्या नावावर अनुदान टाकून त्यांच्याकडून पैसे घेतले आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी. - जयाजी सूर्यवंशी ( शेतकरी नेते )