कॉल सेंटरविरोधात कर्मचाऱ्यांचे आंदोलन
By Admin | Updated: July 7, 2017 01:17 IST2017-07-07T01:12:23+5:302017-07-07T01:17:54+5:30
औरंगाबाद : इंटेलनेट ग्लोबल सर्व्हिसेस प्रा. लि. कंपनीच्या व्होडाफोन कॉल सेंटरमधील ४०० कर्मचाऱ्यांनी कंपनी विरोधात आंदोलन केले.

कॉल सेंटरविरोधात कर्मचाऱ्यांचे आंदोलन
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : इंटेलनेट ग्लोबल सर्व्हिसेस प्रा. लि. कंपनीच्या व्होडाफोन कॉल सेंटरमधील सुमारे ४०० कर्मचाऱ्यांनी गुरुवारी (दि.६) कंपनी विरोधात जोरदार आंदोलन केले. ही कंपनी पुढील महिन्याअखेर बंद होणार असून, कर्मचाऱ्यांना नोटीस बजावून काम सोडण्याचे आदेश देण्यात आले. रोजगार जाणार असल्यामुळे कंपनीकडे कर्मचाऱ्यांनी काही मागण्या केल्या आहेत. त्या मागण्यांचे निवेदन स्वीकारण्यास कंपनीने नकार दिल्यामुळे तणाव निर्माण झाला.