शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

लाचेसाठी पहाटे २ वाजता उठून गेला कर्मचारी; २० हजार घेताना महसूल सहाय्यक रंगेहाथ पकडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2025 16:30 IST

बिनदिक्कत वाळू तस्करीसाठी महसूल सहाय्यकाने ट्रॅक्टर चालकाकडून २० हजारांची लाच घेतली

सिल्लोड: बिनदिक्कत वाळू तस्करीसाठी ट्रॅक्टर चालकाकडून २० हजारांची लाच घेताना महसूल सहाय्यकाला एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले. शरद दयाराम पाटील ( ४०, वर्ष रा.बजरंग चौक, छत्रपती संभाजीनगर ) असे लाचखोर कर्मचाऱ्याचे नाव आहे. ही कारवाई भराडी येथील एका पेट्रोल पंपावर आज, शनिवारी पहाटे २ करण्यात आली. 

उपळी गावाजवळील पूर्णा नदीपात्रातून मोठ्या प्रमाणावर वाळूची तस्करी करण्यात येथे. येथून बिनदिक्कत अवैध वाळू वाहतूक करू देण्यासाठी सिल्लोड तहसील येथील महसूल सहाय्यक शरद पाटील याने एका ट्रॅक्टर चालकाला २५ हजारांची लाच (महिन्याचा हप्ता) मागितली. तडजोडीअंती २० हजार लाच देण्याचे ठरले. मात्र, हप्ता द्यायचा नसल्याने ट्रॅक्टर चालकाने लाच लुचपत विभागाकडे तक्रार केली. एसीबीने तक्रारीची पडताळणी करून शनिवारी पहाटे सापळा लावला. भराडी येथील पेट्रोल पंपावर तडजोड अंती २० हजारांची लाच घेताना महसूल सहाय्यक पाटील याला एसीबी पथकाने  रंगेहाथ पकडले. या प्रकरणी सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात  शनिवारी सकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप आटोळे, अपर पोलिस अधीक्षक मुकुंद अघाव , पोलीस उपअधीक्षक राजीव तळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक केशव दिंडे, सहाय्यक सापळा अधिकारी विजय वगरे, पोहकॉ अशोक नागरगोजे, राजेंद्र सिनकर यांच्या पथकाने केली.

दीड वर्षांत चार कर्मचारी एसीबीच्या जाळ्यातसिल्लोड तालुक्यात वाळूतस्करी वाढली आहे. गेल्या दीड वर्षांत सिल्लोड तहसिल कार्यालयातील एक पेशकार, एक तलाठी, एक कोतवाल असे तीन कर्मचारी वाळूचा हप्ता घेताना लाच लुचपत विभागाने पकडले गेले. मात्र तरीही लाचखोरी कमी झाली नाही. शनिवारी पहाटे पुन्हा एका कर्मचाऱ्याला एसीबीने रंगेहाथ पकडल्याने हा आकडा आता चारवर गेला आहे.

टॅग्स :Revenue Departmentमहसूल विभागAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागCrime Newsगुन्हेगारीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर