शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

नोकरदार अभियंता विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या; आठ महिन्यापूर्वी झाला होता विवाह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2021 18:33 IST

बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील मेघना हिचा अंकुश सूर्यवंशी याच्यासोबत १६ फेब्रुवारी २०२१ रोजी विवाह झाला होता.

ठळक मुद्देवेदांतनगर पोलीस ठाण्यासमोर आणून ठेवला मृतदेह

औरंगाबाद : चिकलठाणा एमआयडीसीतील एका खासगी कंपनीत नोकरीला असलेल्या अभियंता विवाहितेने पदमपुरा येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी रात्री ७ वाजेच्या सुुमारास घडली. या तरुणीचा आठ महिन्यांपूर्वी विवाह झाला होता. मेघना अंकुश सूर्यवंशी (२३) असे विवाहितेचे नाव आहे.

बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील मेघना हिचा अंकुश सूर्यवंशी याच्यासोबत १६ फेब्रुवारी २०२१ रोजी विवाह झाला होता. अंकुश हा वाळूज एमआयडीसीत एका कंपनीत मेकॅनिकल इंजिनअर म्हणून नोकरीला आहे. लग्नानंतर काही दिवसातच या दाम्प्त्यामध्ये वाद सुरु झाले. अकुंशचे कंपनीतील एका तरुणीशी प्रेमसंबंध असल्याची माहिती मेघना यांना मिळाली होती. गुरूवारी रात्री ७ वाजता अंकुश सूर्यवंशी घरी आला तेव्हा त्यास मेघना यांनी सिलिंग फॅनला साडीने गळफास घेतल्याचे दिसले. घाटी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. शुक्रवारी सकाळी मेघना यांचे नातेवाईक घाटी रुग्णालयात आले. त्यांनी अंकुश हा पत्नीशी व्यवस्थित वागत नव्हता. त्याचे कंपनीतील एका तरुणीशी प्रेमसंबंध होते, असा आरोप केला. या संबंधाची कुणकुण मेघना यांना लागल्यानंतर त्यांनी नवऱ्याचा मोबाईल तपासला तेव्हा त्यामध्ये संबंधित मुलीसोबत चॅटिंग केल्याचे आढळले होते. याबाबत मेघनाने तिच्या आईला देखील सांगितल्याचे नातेवाईकांनी स्पष्ट केले.

माहेरी होणार अंत्यसंस्कारमृत विवाहितेवर बीड जिल्ह्यातील माहेरी अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पतीवर गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी नातेवाईकांनी उत्तरीय तपासणी झाल्यानंतर मृतदेह थेट वेदांतनगर पोलीस ठाण्यासमोर आणून ठेवला होता. रात्री आठच्या सुमारास वरिष्ठ निरीक्षक गणपत दराडे यांनी नातेवाईकांना समजावून सांगितले. पतीवर तपास दरम्यान गुन्हा नोंदविण्यात येईल, असे आश्वासनही देण्यात आले. यानंतर नातेवाईक मृतदेह घेऊन गेले. याप्रकरणी वेदांतनगर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. अधिक तपास हवालदार ए.एच. अहिरे करीत आहेत.

टॅग्स :Deathमृत्यूCrime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद