बाप्पाला भावपूर्ण निरोप
By Admin | Updated: September 10, 2014 00:00 IST2014-09-09T23:37:46+5:302014-09-10T00:00:10+5:30
परभणी : गेल्या अकरा दिवसांपासून भक्तांना खिळवून ठेवणाऱ्या गणपती बाप्पाला सोमवारी भावपूर्ण निरोप देण्यात आला. यानिमित्त शहरात विविध ठिकाणी कार्यक्रम घेण्यात आले.

बाप्पाला भावपूर्ण निरोप
परभणी : गेल्या अकरा दिवसांपासून भक्तांना खिळवून ठेवणाऱ्या गणपती बाप्पाला सोमवारी भावपूर्ण निरोप देण्यात आला. यानिमित्त शहरात विविध ठिकाणी कार्यक्रम घेण्यात आले.
सोमवारी सायंकाळी ६ वाजता विसर्जन मिरवणुकीस प्रारंभ झाला. यामध्ये देशमुख गल्ली मित्रमंडळ, राजे संभाजी मित्र मंडळ, सुवर्णकार गणेश मंडळ, बालाजी गणेश मंडळ, नागराज मित्रमंडळ, ओम मित्रमंडळ यांच्यासह इतर काही मंडळांनी सहभाग नोंदविला होता.
सजीव देखाव्यासह ढोल-ताशांचा गजर आणि नृत्याने परिसर दणाणून गेला होता. शहरातील भाविक बाप्पाला निरोप देण्यासाठी मिरवणुकीत सहभागी झाले होते. विठ्ठल-रुख्मिणी, सीता-राम, हनुमान व वानरसेना आदी देखावे आकर्षण ठरले. नागराज मित्रमंडळाच्या वतीने सादर केलेल्या समईनृत्याला रसिकांनी मोठा प्रतिसाद दिला. सुवर्णकार गणेश मंडळाचा बाप्पाचा रथ भाविकांचे लक्ष वेधून घेत होता. दिंडीमध्ये सहभागी झालेले बाल-गोपाळ, कलशधारी महिला, भारुडकार आदींंनी वातावरण भक्तिमय झाले होते.
शिवाजी चौकामध्ये खा. बंडू जाधव, युवासेनेचे डॉ.राहुल पाटील, गंगाप्रसाद आणेराव, माणिक पोंढे, अनिल डहाळे यांच्यासह शिवसैनिकांनी गणेश मंडळांचे स्वागत केले. तसेच दुसऱ्या व्यासपीठावर जिल्हाधिकारी एस.पी. सिंह, जिल्हा पोलिस अधीक्षक अनंत रोकडे, उपअधीक्षक प्रणय अशोक, दीपक पुजारी यांची उपस्थिती होती. या मिरवणुकीत उंट, घोडे, लेझीम पथक, वासुदेवही सहभागी झाले होते. पोलिस प्रशासनाने मिरवणुकीसाठी चोख बंदोबस्त ठेवला होता. गणेश मंडळांनी रात्री उशिरा गणपती बाप्पाचे विसर्जन केले.
(प्रतिनिधी)