एसटीच्या निवृत्त कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीचा अपहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:32 IST2020-12-17T04:32:38+5:302020-12-17T04:32:38+5:30

इरफान साजेद कुरेशी (रा. हर्सूल), शफिक मलंग शहा कादरी, शेख शमशेर शेख इब्राहिम (रा. बिलोली, नांदेड) आणि ...

Embezzlement of provident fund of retired employees of ST | एसटीच्या निवृत्त कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीचा अपहार

एसटीच्या निवृत्त कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीचा अपहार

इरफान साजेद कुरेशी (रा. हर्सूल), शफिक मलंग शहा कादरी, शेख शमशेर शेख इब्राहिम (रा. बिलोली, नांदेड) आणि बनावट खाते तयार करण्यास मदत करणारे तत्कालीन बँक कर्मचारी यांचा आरोपींमध्ये समावेश आहे.

क्रांतीचौक पोलिसांनी सांगितले की, तक्रारदार साहेबराव लक्ष्‍मण कसबे हे राज्य परिवहन महामंडळात विभागीय लेखा अधिकारी आहेत. २८ ऑगस्ट २०१८ ते कालपर्यंतच्या कालावधीत एसटी महामंडळातील समान नावे असलेल्या तीन कर्मचाऱ्यांच्या नावे आरोपींनी एस.टी. कर्मचारी सहकारी बँकेत खाते उघडले होते. तीन कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीच्या खात्यातून नापरतावा उचल कर्जाची रक्कम या खात्यात जमा केली. खात्यात जमा करण्यात आलेले २ लाख ८० हजार रुपये परस्पर काढून अपहार केला. हा प्रकार समोर आल्यावर विभागीय लेखाधिकारी कसबे यांनी मंगळवारी क्रांतीचौक पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पोलीस निरीक्षक अमोल देवकर तपास करीत आहेत.

Web Title: Embezzlement of provident fund of retired employees of ST

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.