अंगणवाडी सेविकांचा मागण्यांसदर्भात एल्गार

By Admin | Updated: April 6, 2017 23:14 IST2017-04-06T23:05:54+5:302017-04-06T23:14:58+5:30

बीड : जिल्हाभरातील अंगणवाडी सेविकांनी एल्गार पुकारला. याप्रसंगी मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

Elgar, on the demands of Aanganwadi sevikas | अंगणवाडी सेविकांचा मागण्यांसदर्भात एल्गार

अंगणवाडी सेविकांचा मागण्यांसदर्भात एल्गार

बीड : शासनाने अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या मानधनात दरवर्षी वेतनवाढीप्रमाणे वाढ करण्याकरिता समिती गठीत केलेली आहे. या समितीच्या प्रस्तावानुसार अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ करावी, या मागणीसाठी बीड येथे जिल्हाभरातील अंगणवाडी सेविकांनी एल्गार पुकारला. याप्रसंगी मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
बीड शहरातील भगवानबाबा प्रतिष्ठान येथे मेळावा घेऊन त्यानंतर प्रशासनाला निवेदन देण्यात आले. मागील अनेक वर्षांपासून अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे प्रश्न प्रलंबित आहेत. शासनाकडे वेळोवेळी मागणी करूनही आमच्या प्रश्नाकडे हे सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप यावेळी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका व मदतनीस महासंघाच्या बीड जिल्हा उपाध्यक्ष कमल बांगर यांनी केला आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मानधन दरमहा पाच तारखेपर्यंत अदा करणे आवश्यक आहे. मात्र, असे होत नसल्याचे पहावयास मिळते. जुलै २०१३ पासून मिनी अंगणवाडी सेविकांच्या मानधनात केंद्र सरकारने ७५० रूपयांची वाढ केलेली आहे. वेळोवेळी तोंडी व लेखी विनंती करूनही अद्यापपर्यंत सदरील थकीत मानधनातील फरक अदा करण्यात आलेला नाही. हा फरक शासनाने तात्काळ अदा करावा.
अंगणवाडी सेविकांना उन्हाळी सुट्या एक महिन्याच्या देण्यात याव्यात. अनेक वेळा सेविका व मदतनीस यांना सोयीच्या ठिकाणी बदली करून घेण्याची तरतूद नाही. यापुढील काळात सेविकांना व मदतनीस यांना सोयीच्या ठिकाणी बदल्या करण्याची तरतूद करावी, अंगणवाडी सेविका व मदतनीसांना एक महिन्याची आजारी रजा देण्यात यावी, ही मागणी अनेक वर्षांपासून महासंघाच्या वतीने करूनही शासन गांभीर्याने घेत नसल्याचा आरोप यावेळी आंदोलनकर्त्यांनी महिलांनी केला.
याप्रसंगी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका मदतनीस व महासंघाचे प्रदेशाध्यक्ष भगवान देशमुख, जिल्हा संघटक सचिन आंधळे यांच्यासह जिल्हाभरातील अंगणवाडी सेविका, मदतनीस यांची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)

Web Title: Elgar, on the demands of Aanganwadi sevikas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.