पाझर तलावात बुडून अकरा वर्षीय मुलीचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:04 IST2021-07-20T04:04:36+5:302021-07-20T04:04:36+5:30

वडोद बाजार : फुलंब्री तालुक्यातील धानोरा शिवारातील कल्याणी ज्ञानेश्वर साळुंके (११) हिचा रिधोरा येथील पाझर तलावात बुडून मृत्यू ...

Eleven-year-old girl drowns in Pazhar Lake | पाझर तलावात बुडून अकरा वर्षीय मुलीचा मृत्यू

पाझर तलावात बुडून अकरा वर्षीय मुलीचा मृत्यू

वडोद बाजार : फुलंब्री तालुक्यातील धानोरा शिवारातील कल्याणी ज्ञानेश्वर साळुंके (११) हिचा रिधोरा येथील पाझर तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. सोमवारी सकाळी तलावात तिचा मृतदेह आढळून आला. कालपासून संबंधित मुलगी घरातून बेपत्ता होती.

पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहितीनुसार, धानोरा शिवारातील ज्ञानेश्वर सोळुंके यांचे रिधोरा भागातील पाझर तलावापासून एक किलोमीटर अंतरावर घर आहे. कल्याणी रविवारी दुपारपासून घरातून बेपत्ता होती. संध्याकाळपर्यंत ती न आल्याने नातेवाइकांनी तिचा गावात सर्वत्र शोध घेतला असता, ती आढळून आली नव्हती. त्यामुळे सोमवारी सकाळी कल्याणीचे नातेवाईक वडोद बाजार पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यास येणार होते. मात्र, सोमवारी पहाटे सहा वाजता घरापासून एक किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या पाझर तलावात कल्याणीचा मृतदेह आढळून आला. नातेवाइकांनी वडोद बाजार पोलीस ठाण्याच्या सहायक पोलीस निरीक्षक आरती जाधव यांना याबाबत माहिती दिली. यानंतर सपोनि. आरती जाधव यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी नागरिकांच्या मदतीने मुलीचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढून फुलंब्री येथील शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणी करत, ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद केली. कल्याणी खेळण्यासाठी बाहेर पडली असून, या दरम्यान ती पाण्यात बुडाली असावी, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. पुढील तपास पोलीस नाईक अंकुश बागल करीत आहे.

--- फोटो

190721\img_20210719_190803_1.jpg

Web Title: Eleven-year-old girl drowns in Pazhar Lake