वीज ग्राहकांकडे ८६६ कोटींची बाकी
By Admin | Updated: July 10, 2017 00:05 IST2017-07-10T00:00:54+5:302017-07-10T00:05:30+5:30
परभणी : परभणी जिल्ह्यामध्ये महावितरणचे २ लाख ८२ हजार वीज ग्राहक आहेत़ या ग्राहकांना १० उपविभागांतर्गत वीजपुरवठा केला जातो़ या ग्राहकांकडे महावितरणची ८६६ कोटी रुपयांची थकबाकी आहे़

वीज ग्राहकांकडे ८६६ कोटींची बाकी
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : परभणी जिल्ह्यामध्ये महावितरणचे २ लाख ८२ हजार वीज ग्राहक आहेत़ या ग्राहकांना १० उपविभागांतर्गत वीजपुरवठा केला जातो़ या ग्राहकांकडे महावितरणची ८६६ कोटी रुपयांची थकबाकी आहे़ त्यामुळे महावितरणला ग्राहकांना सेवा पुरविण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे़
विद्युत वितरण कंपनीच्या वतीने जिल्ह्यातील २ लाख ८२ हजार ग्राहकांना वीजपुरवठा करण्यासाठी १० उपविभाग स्थापना केले आहेत़ यामध्ये परभणी शहर, पाथरी, पूर्णा, परभणी ग्रामीण, गंगाखेड, जिंतूर, मानवत, पालम, सेलू, सोनपेठ या उपविभागांतर्गत वीज ग्राहकांना वीज पुरवठा केला जातो़ तसेच ग्राहकांना विजेच्या संबंधी येणाऱ्या अडचणी या उपविभागांतर्गत सोडविल्या जातात़ विद्युत वितरण कंपनीच्या वतीने वीज पुरवठा केलेल्या ग्राहकांना महिन्याकाठी बिल दिले जाते़ परंतु, गेल्या चार ते पाच वर्षांपासून महावितरणच्या काही वीज ग्राहकांनी त्यांना आलेल्या बिलाचा भरणा केला नाही़ त्यामुळे महावितरणच्या थकबाकीचा डोंगर वाढत गेला आहे़ यामध्ये १ लाख ७० हजार ९०० घरगुती वीज ग्राहक आहेत़ त्यांच्याकडे १५६ कोटींची थकबाकी आहे़ १२ हजार ४०५ व्यापारी आहेत, त्यांच्याकडे ९ कोटी ५९ लाख, ३ हजार ४८७ औद्योगिक ग्राहकांकडे साडेपाच कोटी, ९२ हजार कृषीपंपधारकांकडे ६०० कोटी, ७५२ नळयोजना पाणीपुरवठ्याकडे २० कोटी, १ हजार ५८३ पथदिव्यांची ७५ कोटींची थकबाकी आहे़, अशी एकूण महावितरणची ८६६ कोटी रुपयांची थकबाकी आहे़ वाढत्या थकबाकीमुळे महावितरणला जिल्ह्यातील वीज ग्राहकांना येणाऱ्या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे़ त्यामुळे वीज ग्राहकांनी थकबाकीचा भरणा करावा, असे आवाहन करण्यात आले आहे़