शासकीय वसाहतीत शिपायांनीच केली वीजचोरी

By Admin | Updated: June 18, 2017 00:11 IST2017-06-18T00:05:00+5:302017-06-18T00:11:47+5:30

नांदेड : स्नेहनगर येथील शासकीय वसाहतीत वास्तव्यास असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दोन शिपायांनीच आकडे टाकून वीजचोरी केल्याचा प्रकार शनिवारी उघडकीस आला़

Electricity only by the soldiers in the government colony | शासकीय वसाहतीत शिपायांनीच केली वीजचोरी

शासकीय वसाहतीत शिपायांनीच केली वीजचोरी

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : स्नेहनगर येथील शासकीय वसाहतीत वास्तव्यास असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दोन शिपायांनीच आकडे टाकून वीजचोरी केल्याचा प्रकार शनिवारी उघडकीस आला़ या दोन्ही कर्मचाऱ्यांविरुद्ध महावितरणच्या लातूर येथील पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात येणार आहे़
महावितरणच्या शहर विभागाअंतर्गत असलेल्या युनिट- ४ मध्ये कार्यरत असलेल्या सहाय्यक अभियंता प्राची राठोड पथकासह शनिवारी स्नेहनगर शासकीय वसाहतीत तपासणी करीत होत्या़ यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागात शिपाई पदावर असलेले सुधाकर रघुनाथ सोनावळे हे आकडा टाकून वीजचोरी करीत असल्याचे आढळले़ सोनावळे यांचा वीजपुरवठा ३८ हजारांच्या थकबाकीमुळे कायमस्वरुपी खंडित करण्यात आला होता़ त्यांनी २२०३ युनिट वीजचोरी केल्याचे सिद्ध झाले असून त्यांना त्याबदल्यात २८, २०० रुपयांचे बिल लावले आहे़ तसेच दिगंबर दत्ता हटकर हे वीजमीटर न घेता थेट आकडा टाकून वीज वापरत होते़ त्यांनी २५६ युनिटची वीजचोरी केल्यामुळे त्यांना ३,९४० रुपयांचे बिल दिले आहे़ दोघांवरही वीज कायद्याप्रमाणे महावितरणच्या लातूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात येणार आहे़ वीजग्राहकांनी अधिकृत वीजजोडणी घेऊन वीज वापर करावा, असे आवाहन मुख्य अभियंता अविनाश पाटोळे यांनी केले़

Web Title: Electricity only by the soldiers in the government colony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.