हिंगोली शहरातही विजेचा कडकडाट; जोरदार पाऊस
By Admin | Updated: March 27, 2016 23:50 IST2016-03-27T23:45:02+5:302016-03-27T23:50:44+5:30
हिंगोली : शहरात रविवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. रात्री ९ वाजण्याच्या सुमारास विजांच्या कडकडाटांसह अवकाळी पावसाने हजेरी लावली.

हिंगोली शहरातही विजेचा कडकडाट; जोरदार पाऊस
हिंगोली : शहरात रविवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. रात्री ९ वाजण्याच्या सुमारास विजांच्या कडकडाटांसह अवकाळी पावसाने हजेरी लावली.
रविवारी रात्री अवकाळी पावसाचे आगमन होताच नागरिकांची एकच तारांबळ उडाली. विजेच्या कडकडाटासह पाऊस सुरू झाल्याने व्यापाऱ्यांची चांगलीच धावपळ झाली. यावेळी बराच वेळ वीजपुरवठा खंडीत करण्यात आला होता. अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावण्याने ग्रामीण भागातील हळद शिजविणाऱ्या शेतकऱ्यांची धावपळ झाली. या पावसाने उन्हाळा असूनही वातावरणात थंडावा निर्माण झाला. (प्रतिनिधी)