वीजतारा धोकादायक!
By Admin | Updated: January 3, 2017 23:31 IST2017-01-03T23:31:11+5:302017-01-03T23:31:58+5:30
विरेगाव : जालना तालुक्यातील विरेगाव येथील तीन वॉर्डांना वीजपुरवठा करणाऱ्या डीपीची गेल्या एक वर्षापासून दुरवस्था झाली आहे.

वीजतारा धोकादायक!
विरेगाव : जालना तालुक्यातील विरेगाव येथील तीन वॉर्डांना वीजपुरवठा करणाऱ्या डीपीची गेल्या एक वर्षापासून दुरवस्था झाली आहे. झाकन आणि कुंपन नसल्याने उघड्या डीपीमुळे अपघात होण्याची भीती आहे. याबाबत महावितरणकडे तक्रारी करूनही दुर्लक्ष करण्यात येत असल्याने ग्रामस्थांत संताप आहे.
गावातील मुख्य रस्त्यावर डीपी आहे. विशेष म्हणजे या डीपीला एक वर्षापासून झाकन नाही. तसेच डीपीची उंची सुध्दा कमी असल्याने रस्त्यावरून जाणाऱ्या वाहन धडकून अपघात होण्याची भीती ग्रामस्थ व्यक्त करत आहे. उघडी डीपी असल्याने वारंवार त्यात बिघाड होऊन नादुरूस्त होण्याचे प्रमाण वाढल्याने गावातील तीनही वॉर्डात काही दिवसांपासून विजेचा लंपडाव सुरूच आहे. याबाबत ग्रामस्थांनी जालना येथील महावितरणच्या मुख्य कार्यालयात निवेदने देऊन डीपीची दुरूस्ती करण्याची मागणी वारंवार केली परंतु याकडे कानाडोळा करण्यात येत आहे. तसेच गावातील लाईनमनचे सुध्दा याकडे दुर्लक्ष आहे. याकडे महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी लक्ष देऊन डीपीची दुरूस्ती करण्यात यावी अशी मागणी सुरेश जाधव, सुखदेव जाधव, सुभाष बागल, गणेश बोराडे, उध्दव मोठे, संतोश मोठे, दीपक इंगळे आदीसह ग्रामस्थांनी केली आहे. (वार्ताहर)