छत्रपती संभाजीनगर : राज्यात १ जुलैपासून १०० युनिटपेक्षा कमी वापरणाऱ्या ग्राहकांना स्वस्तात वीज मिळणार आहे, पण १०० पेक्षा अधिक युनिटचा वापर करणाऱ्या ग्राहकांना वाढीव वीज दराचा ‘शाॅक’ बसणार आहे. जिल्ह्यातील सुमारे ६ लाख वीज ग्राहकांना वाढीव वीजबिलाला सामोरे जावे लागणार आहे. ३०० युनिटपर्यंत वीज वापर असलेल्या ग्राहकांना ६८ रुपयांपर्यंत वाढीव वीजबिलाला सामोरे जावे लागणार आहे.
घरगुती, औद्योगिक व व्यावसायिक अशा सर्वच ग्राहकांना वीजदरात आगामी पाचही वर्षांत कपात करण्याचे आदेश महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने दिले आहेत. यानुसार राज्यात पहिल्या वर्षी १० टक्के, तर पुढे टप्प्याटप्प्याने पाच वर्षांत २६ टक्क्यांपर्यंत वीजदर कमी होणार असल्याचे सांगण्यात येते. मात्र, आजघडीला १०० युनिटपेक्षा कमी वीज वापरणाऱ्यांना स्वस्तात वीज मिळणार आहे, पण त्यांची वीज स्वस्त करूनही महावितरण मालामालच होणार असल्याची ओरड सर्वसामान्यांतून होत आहे.
आजपासून असा होईल दरात बदल (युनिटनुसार)युनिट - पूर्वीचे दर १ जुलैपासूनबीपीएल-१.७४-१.४८१ ते १०० - ६.३२ - ५.७४१०१ ते ३०० - १२.२३ - १२.५७३०१ ते ५०० - १६.७७ - १६.८५५०० वर - १८.९३ - १९.१५
एक प्रकारे दरवाढचकमी वीज वापरणाऱ्यांना सवलत देण्यात आली. मात्र, जास्त वापर करणाऱ्यांकडून सवलतीचे पैसे वसूल केले जातील. आयोगाने केलेली दरवाढ ही ग्राहकांच्या विरुद्ध आहे. ग्राहकांना साधारण ८ ते १० टक्के जास्त वीज बिल येईल. सोलार वापरणाऱ्या ग्राहकांनाही फटका बसणार आहे. इतकी दरवाढ केल्यानंतरही महावितरणच्या सेवा सुधारणार आहेत का?- हेमंत कापडिया, माजी ग्राहक प्रतिनिधी, वीज नियामक आयोग.
जिल्ह्यातील वीज ग्राहकांची संख्यावर्गवारी- छत्रपती संभाजीनगर ग्रामीण मंडळ- छत्रपती संभाजीनगर शहर मंडळ - एकूणघरगुती - ३,५९,१४७ - ३,०९,०६६ - ६,६८,२१३वाणिज्य - २६,१२२ - ३६,६२१ - ६२,७४३औद्योगिक - ९,३४६- ७,३०५ -१६,६५१कृषी - २,१५,५२७ - २,२४४ -२,१७,७७१पाणीपुरवठा -१,३४० - ५१ - १,३९१पथदिवे - २,६५७ - १,४८७ - ४,१४४यंत्रमाग- ० १६ - १६इतर - ३,८९३ - २,७३० - ६,६२३एकूण ग्राहक - ६,१८,०३२ - ३,५९,५२० - ९,७७,५५२