३६ तासांपासून वीजपुरठा बंद; गावे अंधारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 00:12 IST2017-08-21T00:12:36+5:302017-08-21T00:12:36+5:30
सेनगाव तालुक्यातील गोरेगाव ३३ के.व्ही.चा वीज पुरवठा गेल्या ३६ तासांपासून बंद झाल्यामुळे केंद्रा बु. फिडरवरील १८ गावे अंधारात आले आहेत. वीज पुरवठा १९ आॅगस्ट रोजी सकाळी ५ वाजता बंद झाली तो २० आॅगस्टच्या सायंकाळीपर्यंतही सुरळीत झाला नाही.

३६ तासांपासून वीजपुरठा बंद; गावे अंधारात
लोकमत न्यूज नेटवर्क
केंद्रा बु. : सेनगाव तालुक्यातील गोरेगाव ३३ के.व्ही.चा वीज पुरवठा गेल्या ३६ तासांपासून बंद झाल्यामुळे केंद्रा बु. फिडरवरील १८ गावे अंधारात आले आहेत. वीज पुरवठा १९ आॅगस्ट रोजी सकाळी ५ वाजता बंद झाली तो २० आॅगस्टच्या सायंकाळीपर्यंतही सुरळीत झाला नाही.
वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे दळणवळणातील महत्वाचा घटक मोबाईल डिस्चार्ज झाल्यामुळे ग्राहकांना फटका बसत आहे. त्यातच उकाड्याने ग्रामस्थ हैराण झाले. पिठाच्या गिरण्या, अल्प प्रमाणात चालणारे बोअर, विधन विहिरीवरील वीज पुरवठा बंद झाल्यामुळे ग्रामस्थांना तीव्र पाणी टंचाईला समोरे जावे लागत आहे. गोरेगाव महावितरणच्या कनिष्ठ अभियंत्याचा फोनही संपर्क क्षेत्राच्या बाहेर आहे तर लाईनमनचे मोबाईल चालू असूनही उत्तर मिळत नाही. दोन दिवस झाले तरीही बिघाड मिळत नसल्यामुळे वीज ग्राहकांत संताप व्यक्त होत आहे. डासांच्या प्रादुर्भावाने रात्रीच्या वेळी लहान बालके, महिला यांना मोठा त्रास होत असून रोगराई वाढण्याची शक्यता आहे. इतर ठिकाणचे पाणी प्यायल्यामुळे रोगाला आमंत्रण मिळत आहे. केंद्रा बु., ताकतोडा, कहाकर, वरखेडा, बटवाडी, केंद्रा खु, गोंधनखेडा, जामठी बु. इ. १८ गावे अंधारात आहेत. महावितरणच्या वरिष्ठ अधिकाºयांनी वेळीच लक्ष देण्याची मागणी होत आहे.