वीजबिल भरणा केंद्रातील दरोड्याचाही लागला नाही तपास...
By Admin | Updated: December 9, 2015 23:54 IST2015-12-09T23:45:33+5:302015-12-09T23:54:48+5:30
शहरातील औसा रोड परिसरात रामदेवबाबा मंदिराच्या पाठीमागील गणेश नगरात येथील समता नागरी सहकारी पतसंस्था लातूरच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या वीजबील

वीजबिल भरणा केंद्रातील दरोड्याचाही लागला नाही तपास...
शहरातील औसा रोड परिसरात रामदेवबाबा मंदिराच्या पाठीमागील गणेश नगरात येथील समता नागरी सहकारी पतसंस्था लातूरच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या वीजबील भरणा केंद्रातून दोन तरुणांनी ३० सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास रिव्हॉल्वरचा धाक दाखवून १ लाख ४ हजार ९०४ रुपये लुटल्याची खळबळजनक घटना घडली. गणेशनगर येथील वीजबिल भरणा केंद्रातील लिपीक शशिकांत कुलकर्णी यांनी दिवसभर जमा झालेली रक्कम एकत्रित करुन वीज बिल भरणा केंद्र बंद करण्याच्या तयारीत असताना सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास दुचाकीवर आलेल्या दोन तरुणांनी वीज बिल भरणा केंद्रात घुसून कुलकर्णी यांच्या कानशिलावर रिव्हॉल्वर लावत त्यांच्याकडील १ लाख ४ हजार ९०४ रुपयांची रक्कम घेऊन पसार झाले. या प्रकरणी पोलिसांनी सीसीटीव्हीतील फुटेजवरुन रेखाचित्र जारी केले. मात्र आरोपींचा शोध लागला नाही.
बाजारपेठ परिसरात व्यापारी अनिल वसंत कापसे यांचे गोदाम आहे. या गोदामामध्ये ते आपल्या दुकानातील माल साठवून ठेवत असत. नेमके हेच हेरुन या दरोडेखोरांनी बाजार परिसरातील हे गोदाम ३ सप्टेंबरच्या मध्यरात्री फोडले होते. या गोदामामधील २ लाख ६३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल दरोडेखोरांनी लंपास केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी अज्ञात दरोडेखोरांविरोधात मुरुड पोलिस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा छडा लातूरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने लावत, बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील दरोडेखोरांना पकडून न्यायालयासमोर हजर केले होते. हा अपवाद वगळता बहुतांश घटनांचा तपास लागला नाही.