झोपडपट्टीसह उच्चभ्रू वसाहतीत होतेय वीजचोरी

By Admin | Updated: November 22, 2015 23:40 IST2015-11-22T23:30:35+5:302015-11-22T23:40:27+5:30

जालना: शहरातील झोपडपट्टीसह अनेक उच्चभू्र वसाहतीत आकडे टाकून दररोज लाखो रुपयांची वीजचोरी होत आहे. महावितरणकडूनही काही भागातील

Electricity is being built in the high street with slum | झोपडपट्टीसह उच्चभ्रू वसाहतीत होतेय वीजचोरी

झोपडपट्टीसह उच्चभ्रू वसाहतीत होतेय वीजचोरी


जालना: शहरातील झोपडपट्टीसह अनेक उच्चभू्र वसाहतीत आकडे टाकून दररोज लाखो रुपयांची वीजचोरी होत आहे. महावितरणकडूनही काही भागातील आकडेबहाद्दरांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते. दिवसाकाठी आकडेबहाद्दर पाच ते सात लाख रुपयांची वीजचोरी करीत असल्याचा अंदाज महावितरणच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
शहरातील लालबाग, रेल्वेस्थानक परिसर, इंदिरानगर, कन्हैयानगर, चंदनझिरा, नूतनवसाहत, सुंदर नगर तसेच अनेक मुख्य रस्त्यावरील नागरिकही आकडे टाकून बिनदिक्कत वीजेचारी करीत आहेत. वाढत्या आकड्यांमुळे पसिरातील नियमित वीज बिल भरणाऱ्या नागरिकांना कमी दाबाने वीज मिळणे अथवा वारंवार बिघाड होण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही नागरिक अनेक वर्षांपासून वीजेचारी करून महावितरणला चुना लावत आहेत. महावितरणने आकडे जप्त केल्यानंतरही आकडे कमी होण्याऐवजी वाढतच आहेत. काही नागरिकांचे वीज थकबाकीमुळे वीज मीटर जप्त करण्यात आले आहे. असे वीजग्राहक आकडे टाकून चोरी करीत आहेत. काही भागातील नागरिक कोणाचीही भीती न बाळगता चोवीस तास विजेचा वापर करतात. विशेष म्हणजे महावितरणचे अभियंते तसेच कर्मचाऱ्यांनाही दमदाटी केली जाते. एकूच आकडेबहाद्दरांचे मनोधैर्य वाढत असल्याने महावितरणही हातबल झाली आहे. (प्रतिनिधी)
शहरातील वाढते भारनियमन कमी करण्यासाठी पुढाकार घेण्यात येणार असल्याचे अधीक्षक अभियंता बी.टी.जाधव यांनी सांगितले. वीज गळतीचे प्रमाण कमी करण्यासोबतच वसुलीचे प्रमाणही वाढविण्यात येणार आहे. यासाठी विशेष पथकांची स्थापना करण्यात येणार आहे. यासाठी नियोजन करण्यात आले असून, आठवड्यातील एक दिवस वसुलीसाठी राखीव ठैवण्यात येणार आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात घरगुती व औद्योगिक ग्राहक मिळून तब्बल ५७ कोटी रुपयांची थकबाकी आहे. शहर आकडेमुक्त करण्यासाठी वीज ग्राहकांमध्ये जनजागृती करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Web Title: Electricity is being built in the high street with slum

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.