नऊ सभापतींची आज होणार निवड
By Admin | Updated: September 13, 2014 23:05 IST2014-09-13T22:55:04+5:302014-09-13T23:05:08+5:30
परभणी : जिल्ह्यातील नऊ पंचायत समित्यांच्या सभापती व उपसभापतींची १४ सप्टेंबर रोजी निवड करण्यात येणार आहे़

नऊ सभापतींची आज होणार निवड
परभणी : जिल्ह्यातील नऊ पंचायत समित्यांच्या सभापती व उपसभापतींची १४ सप्टेंबर रोजी निवड करण्यात येणार आहे़ प्रशासनाच्या वतीने प्रत्येक पंचायत समितीकरिता पिठासीन अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे़
जिंतूर पंचायत समितीसाठी अप्पर जिल्हाधिकारी संभाजी झावरे, परभणी पंचायत समितीसाठी उपजिल्हाधिकारी महेश वडतकर, पूर्णा- सुनील महेंद्रकर, गंगाखेड- एस़जी़ मावची, मानवत- दिलीप कच्छवे, पाथरी- येथे ब्रिजेश पाटील, सोनपेठ- येथे संतोष वेणीकर, पालम- येथे गोविंद रणवीरकर तर सेलू पंचायत समितीसाठी पी़एस़ बोरगावकर यांची पीठासीन अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे़ पंचायत समितीच्या सर्व सदस्यांना विशेष सभेसाठी नोटिसा देण्यात आल्या असून, दुपारी २ वाजता विशेष सभा होणार आहे़, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली़