शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

मी पाहिलेली निवडणूक....दुसऱ्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे होत्या फक्त दोन गाड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2019 19:50 IST

१९५७ साली झालेल्या दुसऱ्या लोकसभा निवडणुकीत औरंगाबादचे जिल्हाधिकारी असलेले भुजंगराव कुलकर्णी सांगत आहेत क्षणचित्रे

हैदराबाद मुक्तिसंग्राम लढ्यानंतरही मराठवाडा हैदराबाद राज्याचा भाग होता. १९५६ साली मराठवाडा महाराष्ट्रात सहभागी झाला. तेव्हा यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री होते. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ जोमात होती. १९५२ साली झालेल्या पहिल्या लोकसभा निवडणुकीवेळी हैदराबादेत नोकरीला असल्यामुळे मराठवाड्यातील निवडणुकीचा जास्त संबंध आला नाही. १९५७ साली झालेल्या दुसऱ्या लोकसभा निवडणुकीला औरंगाबादचा जिल्हाधिकारी होतो. जिल्हाधिकारी असल्यामुळे औरंगाबाद आणि जालना (तेव्हा एकच जिल्हा अस्तित्वात होता.) लोकसभा मतदारसंघाचा निवडणूक अधिकारी होतो.

या निवडणुकीत प्रचारासाठी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू औरंगाबाद दौऱ्यावर आले होते. त्यांनी औरंगाबादेतील आमखास मैदान, जालना आणि जळगाव लोकसभेसाठी फर्दापूर जवळच्या एका खेड्यात प्रचार सभा घेतली. याच दौऱ्यात नेहरू यांनी वेरूळ, अजिंठा लेण्यांना भेटी दिल्या होत्या.त्यांचा मुक्काम औरंगाबाद हॉटेलमध्ये होता. त्या हॉटेलमधून नेहरू यांचे जेवण, चहा, नाश्ता जालना, अजिंठ्यापर्यंत येत असे. जिल्हाधिकारी असल्यामुळे नेहरूंना लेण्या दाखविण्यासाठी त्यांच्या सुरक्षेची पूर्ण जबाबदारी माझ्यावर होती. मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना तब्येत खराब झाल्यामुळे या दौऱ्याच्या मध्यातून जावे लागले. उमेदवार तीन-चार असल्यामुळे जास्त प्रचार वगैरे काही नसे. शक्य तेवढ्या ठिकाणी उमेदवार भेटी देत. तेव्हा प्रचार करण्यासाठी अडचणी खूप होत्या. जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अवघ्या दोन गाड्या होत्या. त्याच गाड्यांतून फिरावे लागे. पेट्रोल देण्यासाठी एक अधिकारी होता. त्याने कूपन दिल्यानंतरच पेट्रोल मिळत असे. निवडणुकीचे साहित्य घेऊन जाण्यासाठी भाड्याने ट्रकच घ्याव्या लागत. निवडणुकीचे सामान, अधिकारी आणि कर्मचारी त्या गाड्यांमधूनच मतदानाच्या एक दिवस अगोदर गावात पोहोचत. निवडणुकीचे अतिरिक्त साहित्य घेऊन जावे लागे. कारण पुन्हा त्या गावात ऐनवेळी काहीही पोहोचवता येणे शक्य नव्हते. एक हजार मताला मतदान केंद्र होते. 

तीन-चार वाड्यांसाठी एक मतदान केंद्र दिले जाई. पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी संयुक्तपणे परिस्थितीचा आढावा घेत. मतदान केंद्रांना भेटी देत होेतो. आमच्या गाड्यातही निवडणुकीचे साहित्य ठेवलेले असायचे. काही अडचण आली की, ते मतदान केंद्रांवर देत असत. निवडणुकीपूर्वी केली जाणारी तयारीच महत्त्वाची असे. ऐनवेळी काहीही मिळत नसे. त्या निवडणुकीत जळगावला पाटसकर होते. औरंगाबादेत काँग्रेसकडून स्वामी रामानंद तीर्थ आणि कम्युनिस्ट पक्षाकडून कॉ. मिरजकर निवडणुकीला उभे होते. यात स्वामीजी जिंकले. जालना मतदारसंघात तेव्हाचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष परभणीचे बाबासाहेब सवणेकर उभे होते. मात्र, त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. तेव्हा निवडणुकीत आचारसंहिता वगैरे असला काही प्रकार नव्हता. निवडणूक आयोग प्रत्येक निवडणुकीत झालेल्या चुकांमधून आगामी निवडणुकीत दुरुस्ती करीत होता. १९५७ साली केलेल्या निवडणुकीच्या कामाचे कौतुक विजयी उमेदवार स्वामी रामानंद तीर्थ आणि विरोधी उमेदवार कॉ. मिरजकर यांनी पत्र पाठवून केले होते.

- भुजंगराव कुलकर्णी, ( सेवानिवृत्त आयएएस अधिकारी)

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९AurangabadऔरंगाबादMarathwadaमराठवाडाElectionनिवडणूक