तालुक्यात २६४ प्रभागांत ७१७ सदस्यपदांसाठी ७१ ग्रामपंचायतींची निवडणूक पार पडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:06 IST2021-01-16T04:06:02+5:302021-01-16T04:06:02+5:30

औरंगाबाद तालुका : पहिल्यांदाच नवतरुणांची सर्वाधिक उमेदवारी करमाड : गावपातळीवरील सर्वाधिक महत्त्वाची निवडणूक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीत शुक्रवारी ...

Elections of 71 Gram Panchayats were held for 717 member posts in 264 wards of the taluka | तालुक्यात २६४ प्रभागांत ७१७ सदस्यपदांसाठी ७१ ग्रामपंचायतींची निवडणूक पार पडली

तालुक्यात २६४ प्रभागांत ७१७ सदस्यपदांसाठी ७१ ग्रामपंचायतींची निवडणूक पार पडली

औरंगाबाद तालुका : पहिल्यांदाच नवतरुणांची सर्वाधिक उमेदवारी

करमाड : गावपातळीवरील सर्वाधिक महत्त्वाची निवडणूक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीत शुक्रवारी औरंगाबाद तालुक्यात सरासरी ------------------------------------------------... मतदान झाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

मतदान प्रक्रियेदरम्यान तालुक्यात काही ठिकाणी किरकोळ वाद वगळता मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. बहुतांश ठिकाणी कोरोना महामारीच्या अनुषंगाने सोशल डिस्टन्सिंग व इतर नियमांना खो दिल्याचे दिसले. मतदान प्रक्रियेच्या वेळी सॅनिटायझरचा वापर तर कुठेच दिसून आला नाही.

काही ठिकाणी दुहेरी, तर

काही ठिकाणी तिरंगी लढत :

तालुक्यातील लाडसावंगी, करमाड, शेकटा, गाढेजळगाव, शेवगा, कुंभेफळ, शेंद्रा बन, शेंद्रा कमंगर आदी मोठ्या लोकसंख्येच्या गावांत शुक्रवारी पहिल्या टप्प्यातील ग्रामपंचायतींसाठीचे मतदान झाले. यातील करमाड, कुंभेफळ, शेंद्रा बन, शेंद्रा कमंगर आदी गावांच्या निवडणुकीत येथील पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमुळे मोठी चुरस असते. करमाड येथे दोन पॅनलमध्ये सरळ लढत झाली. सोबतच यावेळी दोन अपक्षांनीही आपले नशीब अजमावले.

करमाड येथे पाच वॉर्ड मिळून ४ हजार ५०७ मतदारांपैकी तीन हजार ८४० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्याने सरासरी ८५.२०% टक्के मतदान झाले. यात वाॅर्ड क्रमांक १ मध्ये १,०७६ पैकी ९७४, वाॅर्ड क्रमांक २ मध्ये ९९३ पैकी ८७७, वाॅर्ड ३ मध्ये ६८४ पैकी ५३३, वाॅर्ड ४ मध्ये ६९३ पैकी ५६० आणि वाॅर्ड ५ मध्ये १,०६१ पैकी ८९६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

कुंभेफळ येथेही दुरंगी लढतीसोबतच पहिल्यांदाच वाॅर्ड क्रमांक ४ मध्ये एका महिला उमेदवाराने लढत दिल्याने येथे तिरंगी लढत झाली. येथे सरासरी ८५ टक्के मतदान झाले.

◆ तालुक्यातील प्रमुख गावांतील मतदानाची टक्केवारी.

करमाड ८५ टक्के, कुंभेफळ ८५ टक्के, पिंप्रीराजा ७९ टक्के, शेंद्रा कमंगर ८३ टक्के, शेंद्रा बन (गंगापूर जहांगीर) ९२ टक्के.

Web Title: Elections of 71 Gram Panchayats were held for 717 member posts in 264 wards of the taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.