निवडणूक प्रशिक्षण; १६३ कर्मचारी गैरहजर
By Admin | Updated: June 10, 2017 23:38 IST2017-06-10T23:35:15+5:302017-06-10T23:38:01+5:30
वसमत : पूर्णा सहकारी साखर कारखाना निवडणुकीसाठीचे पहिले प्रशिक्षण शनिवारी घेण्यात आले. त्यास तब्बल १६३ कर्मचारी गैरहजर होते.

निवडणूक प्रशिक्षण; १६३ कर्मचारी गैरहजर
लोकमत न्यूज नेटवर्क
वसमत : पूर्णा सहकारी साखर कारखाना निवडणुकीसाठीचे पहिले प्रशिक्षण शनिवारी घेण्यात आले. त्यास तब्बल १६३ कर्मचारी गैरहजर होते. या कर्मचाऱ्यांविरोधात फौजदारी कारवाई करण्याचा इशारा उपविभागीय अधिकारी ज्ञानोबा बानापुरे यांनी दिला आहे.
पूर्णा कारखाना निवडणुकीसाठी कर्मचारी- अधिकाऱ्यांसाठी पहिले प्रशिक्षण शनिवारी घेण्यात आले. निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी ज्ञानोबा बानापुरे यांच्या उपस्थितीत हे प्रशिक्षण पार पडले. तहसीलदार उमाकांत पारधे यांच्यासह निवडणूक विभागाचे अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते. प्रशिक्षणाला ७०० कर्मचाऱ्यांना पाचारण करण्यात आले होते. १६३ जणांनी दांडी मारली. यात केंद्राध्यक्ष ३२, मतदान अधिकारी १०५ व २६ शिपाई यांचा समावेश आहे. गैरहजर अधिकारी- कर्मचाऱ्यांवर सहकारी संस्था निवडणूक नियम २०१४ चे कलम ३ (१) नुसार व भारतीय दंड संहिता १८६० च्या तरतुदी नुसार फौजदारी कारवाईचा इशारा बानापुरे यांनी दिला आहे.