शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

आमदार तानाजी सावंत आणि आमदार संतोष दानवे यांच्या निवडीस खंडपीठात आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2025 14:00 IST

आमदारांसह इतर प्रतिवादींना खंडपीठाची नोटीस; पुढील सुनावणी ८ आठवड्यांनंतर

छत्रपती संभाजीनगर : धाराशिव जिल्ह्यातील परांड्याचे आमदार तानाजी सावंत आणि जालना जिल्ह्यातील भोकरदनचे आमदार संतोष दानवे यांच्या निवडीस आव्हान देणाऱ्या याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल झाल्या आहेत. याचिकांच्या अनुषंगाने न्यायमूर्ती वाय.जी. खोब्रागडे यांनी आमदार सावंत, आमदार दानवे यांच्यासह इतर प्रतिवादींना नोटीस बजावण्याचा आदेश गुरुवारी दिला. या निवडणूक याचिकांवर ८ आठवड्यांनंतर पुढील सुनावणी होणार आहे. सावंत यांच्या निवडीस राहुल मोटे आणि दानवे यांच्या निवडीस चंद्रकांत दानवे यांनी ॲड. संभाजी टोपे यांच्यामार्फत आव्हान दिले आहे.

मोटे यांची निवडणूक याचिकामोटे यांनी दाखल केलेल्या निवडणूक याचिकेत म्हटल्यानुसार आमदार सावंत १५०९ मतांनी विजयी झाले होते. सावंत यांनी अवैध मार्गाचा अवलंब केल्याचे पुरावे याचिकेसोबत जोडले आहेत. भैरवनाथ साखर कारखान्याचे अध्यक्ष तथा आमदार सावंत यांचे बंधू शिवाजी सावंत आणि क्रांती महिला उद्योग समूहाच्या अध्यक्ष अर्चना दराडे यांनाही याचिकेत प्रतिवादी केले आहे.

सावंत यांनी ‘खेळ पैठणीचा’ कार्यक्रमांतर्गत मतदारसंघातील महिलांना साड्या वाटप केल्या. क्रांती महिला उद्योग समूहाच्या खात्यावर पैसे नसताना मोठ्या रकमा त्यांच्या खात्यावर जमा करून त्यातून महिला बचतगटांना पैसे वाटप केले. ‘न्यू होम मिनिस्टर’ कार्यक्रमाद्वारे सावंत कुटुंबातर्फे महिलांना साड्या व भांड्यांचे संच भेट दिले. कामगारांना विवाहासाठी व इतर कामांसाठी पैसे वाटप केले. आमिष दाखवून मते गोळा केली. धार्मिक आणि विखारी प्रचार करून ध्रुवीकरणासाठी उघडपणे पत्रके वाटली. ‘लाडकी बहीण योजनेद्वारे’ पैशांचे आमिष दिले.

दखल घेतली नाहीवरील सर्व घटनांबाबत विविध संघटनांनी, अनेकांनी वैयक्तिकरीत्या केलेल्या तक्रारींची निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दखल घेतली नाही. सावंत थोड्या फरकाने आघाडीवर असताना मतांच्या पुनर्मोजणीची मागणी फेटाळली. तसेच आमदार दानवे यांच्याविरुद्धही अवैध मार्गाचा अवलंब केल्याचा आरोप करण्यात आला आहे. सावंत आणि दानवे यांनी ‘लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम १२३ नुसार अनेक गैरकृत्ये केल्याचे याचिकेत नमूद केले आहे. या दोन्ही आमदारांना ‘अपात्र’ घोषित करावे. तसेच ते निवडून आल्याचा घोषित केलेला निकाल रद्द करावा, अशी विनंती याचिकाकर्त्यांनी केली आहे.

टॅग्स :Tanaji Sawantतानाजी सावंतSantosh Danweyसंतोष दानवेAurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठ