जालना मर्चन्ट बँकेची ५ मे रोजी निवडणूक
By Admin | Updated: April 23, 2015 00:43 IST2015-04-23T00:35:54+5:302015-04-23T00:43:37+5:30
जालना : येथील अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या दी. जालना मर्चन्टस् को.आॅप. बँकेची निवडणूक ५ मे रोजी होणार असून या निवडणुकीत दोन पॅनल मधील उमेदवार आमने-सामने उभे आहेत.

जालना मर्चन्ट बँकेची ५ मे रोजी निवडणूक
जालना : येथील अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या दी. जालना मर्चन्टस् को.आॅप. बँकेची निवडणूक ५ मे रोजी होणार असून या निवडणुकीत दोन पॅनल मधील उमेदवार आमने-सामने उभे आहेत.
बँकेचे संस्थापक अध्यक्ष मोतीराम अग्रवाल तसेच सी.ए. गोविंदप्रसाद मुंदडा या दोन्हींच्या पॅनलमध्ये ही निवडणूक होत आहे. अग्रवाल यांच्या सहकार विकास पॅनलमध्ये गोवर्धन अग्रवाल, सी.ए. गोपाल अग्रवाल, हेमंत ठक्कर, सुभाषचंद्र देवीदान, प्रदीपकुमार मुथा, अंकुश राऊत, विरेंद्र रूणवाल, अॅड. प्रवीण लाहोटी, अनिलकुमार सोनी, मधुसुदन मृत्याल, डॉ. संजय राख, मनोहर सिनगारे हे निवडणूक लढवित आहेत. तर या पॅनलच्या मीनाक्षी दाड व उज्वला मिसाळ यांची बिनविरोध निवड निश्चित आहे.
मुंदडा यांच्या व्यापारी एकता पॅनलमध्ये मुंदडा यांच्यासह अनिल पंच, रितेश कामड, दिलीप बाकलीवाल, रवींद्र फुलबाटी, रामेश्वर पवार, जितेंद्र संचेती, प्रदीप चौधरी, सुंदर साळवे व राजेश शर्मा हे निवडणूक लढवित आहेत. या निवडणुकीकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे. प्रशासनाने या निवडणुकीची पूर्वतयारी केल्याचे सांगण्यात आले.