‘भाऊराव’ कारखान्याची निवडणूक जाहीर
By Admin | Updated: December 17, 2015 00:21 IST2015-12-16T23:42:23+5:302015-12-17T00:21:05+5:30
अर्धापूर : तालुक्यातील भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला असून १७ डिसेंबरपासून निवडणूक प्रक्रिया सुरू होणार आहे

‘भाऊराव’ कारखान्याची निवडणूक जाहीर
अर्धापूर : तालुक्यातील भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला असून १७ डिसेंबरपासून निवडणूक प्रक्रिया सुरू होणार आहे
भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याच्या २१ संचालकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम निवडणूक निर्णय अधिकारी संतोष वेणीकर यांनी जाहीर केला़ अर्ज भरण्याची मुदत १७ ते २१ डिसेंबर असून अर्जाची छाननी २२ रोजी होईल़ २३ डिसेंबर ते ६ जानेवारी २०१६ दरम्यान अर्ज मागे घेता येतील़ ७ जानेवारी रोजी उमेदवारांची अंतिम यादी घोषित होवून १७ जानेवारी रोजी मतदान आणि १८ जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे़ खा़अशोकराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांचा आधार असलेला हा साखर उद्योग समुह प्रसिद्धीला आला़ इतर ठिकाणी बंद पडलेल्या साखर कारखाना क्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकरी आर्थिक परिस्थितीने हतबल झाला असताना या साखर उद्योग समुहाच्या सर्वच युनिटमधील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक हातभार लागला़ कारखान्याच्या सर्व संचालकांनी उद्योग समुहाच्या प्रगतीसाठी परिश्रम घेतले.(वार्ताहर)