‘एल निनो’चा प्रभाव कायम
By Admin | Updated: August 12, 2014 21:05 IST2014-08-12T21:05:13+5:302014-08-12T21:05:13+5:30
पावसाअभावी पश्चिम विदर्भ, मराठवाड्याची स्थिती गंभीर

‘एल निनो’चा प्रभाव कायम
अकोला: 'एल निनो'चा प्रभाव अद्याप कायम असल्याने राज्यात पावसाने दडी मारली असून, मराठवाडा व पश्चिम विदर्भात पाऊसच नसल्याचे या भागातील परिस्थिती गंभीर बनली आहे. दरम्यान, येत्या २0 ऑगस्टपासून राज्यात पावसासाठी अनुकूल वातावरण तयार होण्याची शक्यता कृषी हवामान तज्ज्ञांनी वर्तविली आहे. हवेचा दाब, वातावरणातील आद्र्रता, वार्याची दिशा यावर पावसाचा खेळ अवलंबून असतो. या सर्व बाबी सध्या प्रतिकूल आहेत. हिंद महासागारावर तयार होणारे पावसाचे ढग ह्यएल निनोह्णच्या प्रभावामुळे अमेरिकेतील पश्चिम किनार्याकडे वाहून जात असून, यंदा वरूणराजा रूसण्याचे हे प्रमुख कारण आहे. जून, जूलै महिन्यात पावसाचा खंड पडला. ऑगस्टमध्येही हीच परिस्थिती राहील, अशी अपेक्षा नव्हती; मात्र ह्यएल नीनोह्णचा प्रभाव ऑगस्टमध्येही कायम राहिला आणि कोकण वगळता संपूर्ण राज्यात त्याचे परिणाम दिसून आले. नैऋतेकडून येणारा पाऊस हमखास पडतो. याच क्षेत्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण होत आहे. वार्याची दिशाही बदलत आहे. त्यामुळे राज्यात पावसासाठी अनूकुल स्थिती होत आहे. २0 ऑगस्टपासून परिस्थितीत आणखी बदल होऊन, २७ ऑगस्टनंतर राज्यात दमदार पावसाला सुरू वात होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
** 'एल निनो'चा प्रभाव कायम असल्याने हिंद महासागरावर तयार होणारे पावसाचे ढग अमेरिकेतील पश्चिम किनार्याकडे वळले आहेत; तथापि २0 ऑगस्टपासून पाऊस पडण्यासाठी अनुकूल स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. विदर्भात पज्र्यन्यछाया नसून, 'एलनिनो'चाच परिणाम आहे.
- डॉ. रामचंद्र साबळे, ज्येष्ठ कृषी हवामान शास्त्रज्ञ, पुणे