शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

झेड प्लस सुरक्षा नाकारून एकनाथ शिंदेंना शहीद करायचे होते; संजय शिरसाटांचा रोख कुणाकडे?

By संतोष हिरेमठ | Updated: September 29, 2024 15:52 IST

'एकनाथ शिंदे यांना झेड प्लस सुरक्षा दिली पाहिजे, असे पोलिसांनीच सांगितले होते. तरी त्या फाईलवर सही का केली नाही. काय कारण होते?'

छत्रपती संभाजीनगर : शिवसेना (शिंदेसेनेचे) प्रवक्ते आ. संजय शिरसाट यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत मोठा खुलासा केला आहे. 'एकनाथ शिंदे यांना नक्षलवाद्यांच्या माध्यमातून धमक्या देण्यात आल्या. कोण देत होते धमक्या? त्यांना झेड प्लस सुरक्षा दिली पाहिजे, असे पोलिसांनी स्वत: सांगितले होते. तरी त्या फाईलवर सही का केली नाही. काय कारण होते? काय फरक पडला असता? तुम्हाला त्यांना शहीद करायचे होते. झेड प्लस सुरक्षा नाकारणे, याचा अर्थ एकनाथ शिंदे यांना शहीद करण्याच्या मार्गावर नेऊन उभे करणे, असा होतो. परंतु ते एकनाथ शिंदे होते. सर्व डावपेचाला ओळखून होते', असे शिरसाट म्हणाले.

आ. शिरसाट यांनी रविवारी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी दिघे पॅटर्न एकनाथ शिंदे यांच्यासोबत वापरला जाणार होता, अशी चर्चा मध्यंतरी होती. यात काय तथ्थ आहे, अशी विचारणा पत्रकारांनी केली असताना आ. शिरसाट म्हणाले की, 'आनंद दिघेंच्या मृत्यूसंदर्भात मी काल जे वक्तव्य केले, त्याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात पडले. आनंद दिघे यांचा डिस्चार्ज होणार असताना, अचानक त्यांचा हार्ट अटॅकने मृत्यू कसा होतो? असे मी बोललो. काही लोकांनी त्याचा वेगळा अर्थ घेऊन कुठेतरी लिंक जोडण्याचा प्रयत्न केला.'

'दिघेंवर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे आतोनात प्रेम होते. मातोश्रीवर शिवसेनाप्रमुख आणि दिघे यांचा संवाद आम्ही पाहिलेला आहे.  दिघेंचे वर्चस्व वाढतेय, ते किंग होताय, दिघेंच्या हातात शिवसेनाप्रमुखांनी सर्व काही दिले आहे. मग त्यांना छाटण्याचे प्रयत्न त्यावेळपासून सुरु झाले होते. दिघेंना धुळे येथील संपर्क प्रमुख करण्याचा प्रयत्न झाला. परंतु दिघेंनी त्यास नकार दिला. एखादा माणूस संघटनेत जेव्हा मास लिडर व्हायला जातो, त्या वेळी कटकारस्थान ज्या लोकांनी केला, त्यांच्यावर माझा आक्षेप आहे', असेही आ. शिरसाट म्हणाले. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेSanjay Sirsatसंजय सिरसाटUddhav Thackerayउद्धव ठाकरे