एकास कोठडी, एक बालसुधारगृहात

By Admin | Updated: August 9, 2014 00:35 IST2014-08-09T00:13:02+5:302014-08-09T00:35:53+5:30

उस्मानाबाद : सराफ व्यापाऱ्यास मारहाण करून रोकड, दागिने लंपास केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या दोघांपैकी एकास न्यायालयाने १४ आॅगस्ट पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे़

Ek Kehoda Kothi, in a children's room | एकास कोठडी, एक बालसुधारगृहात

एकास कोठडी, एक बालसुधारगृहात




उस्मानाबाद : सराफ व्यापाऱ्यास मारहाण करून रोकड, दागिने लंपास केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या दोघांपैकी एकास न्यायालयाने १४ आॅगस्ट पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे़ तर एकाची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे़ या प्रकरणात शुक्रवारी आणखी एकास अटक करण्यात आली असून, इतर मुद्देमालाचाही शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले़
याबाबत पलिसांनी सांगितले की, मुंबई येथील सराफा व्यापारी मुकेश मेहता यांना ४ आॅगस्ट रोजी शहरातील येमाई मंदिराजवळ मारहाण करून लूटले होते़ स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि माधव गुंडिले, पोउपनि भास्कर पुल्ली, दरोडा प्रतिबंधक पथकाच्या कर्मचाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली. ६ आॅगस्ट रोजी शहरातील भानुनगर भागात राहणाऱ्या तरूणांनी या व्यापाऱ्यास लुटल्याची माहिती मिळाल्यावरून पोलिसांनी गुरूवारी रात्री भानुनगर येथून प्रवीण नामदेव राठोड, सूरज चंद्रकांत नाईक, पवन रघुनाथ टेहरे व एक अल्पवयीन अशा चौघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे या गुन्ह्याबाबत चौकशी केली असता या चौघांनीही अन्य दोन साथीदारांसह हा गुन्हा केल्याचे कबूल केले. यावरून त्यांना अटक करून त्यांच्या ताब्यातून १ लाख १४ हजार ८०० रूपये रोख व १२ लाख ५१ हजार ६०० रूपये किंमतीचे दागिने असा एकूण १३ लाख ६६ हजार ४०० रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता़ प्रविण राठोड, प्रविण उर्फ पवन रघूनाथ टेहरे यास न्यायालयाने यापूर्वीच पोलिस कोठडी सुनावली आहे़ तर अटकेतील सुरज नाईक यास शुक्रवारी न्यायालयासमोर हजर केले असता १४ आॅगस्ट पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे़ अल्पवयीन मुलाची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे़ तर शुक्रवारी पोलिसांनी विजय कवळेकर या युवकास अटक केली असून, उर्वरित मुद्देमालाचाही शोध सुरू असल्याचे तपासाधिकारी पोनि रायकर यांनी सांगितले़

Web Title: Ek Kehoda Kothi, in a children's room

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.