शानादेश बेदखल
By Admin | Updated: November 20, 2014 00:48 IST2014-11-20T00:30:49+5:302014-11-20T00:48:29+5:30
कडा : डेंग्यू सारख्या भयानक रोगाने कोणाचा बळी न जाता त्याला आटोक्यात आणण्यासाठी उपचार मिळावा यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मुख्यालयी राहून रुग्णांना

शानादेश बेदखल
कडा : डेंग्यू सारख्या भयानक रोगाने कोणाचा बळी न जाता त्याला आटोक्यात आणण्यासाठी उपचार मिळावा यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मुख्यालयी राहून रुग्णांना सेवा देण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. मात्र या आदेशाला केराची टोपली दाखवत वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी मुख्यालयी न राहता रूग्णांना वाऱ्यावर सोडून ये- जा करत आहेत.
येथील निवासस्थानात अधिकारी, कर्मचाऱ्यांचे वास्तव्य नसल्याने रुग्णांना नाईलाजास्तव खाजगी रुग्णालयात दाखल व्हावे लागत आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते महेश खाकाळ यांनी केली आहे.
आष्टी तालुक्यात पाच प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. सव्वादोन लाख नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी ११६ पैकी केवळ ५१ कर्मचाऱ्यांवरच असल्याने मोठी अडचण निर्माण होत आहे. तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात मंजूर पदे ११६ असताना देखील ६५ पदे रिक्त आहेत. अशी भयावह परिस्थिती असताना अधिकारी मुख्यालयी राहणे पसंत करत नाहीत. प्रा.आ. केंद्र व उपकेंद्र या ठिकाणी कोट्यावधी रुपयांचा निधी खर्चून प्रशासनाने निवासस्थाने उभारली आहेत. परंतु अधिकारी , कर्मचारी यात राहत नसल्याने ही निवासस्थाने ओस पडलेली आहेत. याबाबत तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बापू चाबुकस्वार यांना विचारणा केली असता सर्वांनी मुख्यालयी राहण्याचे आदेश दिले असून न राहणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. (वार्ताहर)