वैजापुरात ऐंशी हजारांचा गुटखा पकडला; आरोपी अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:28 IST2020-12-17T04:28:25+5:302020-12-17T04:28:25+5:30

पोलिसांनी सांगितले की, वैजापूर शहर ते शिवराई रस्त्यावर शाह वस्ती आहे. येथील खालेद शाह याच्या घरामध्ये गुटखा साठवून ठेवल्याची ...

Eighty thousand gutkas seized in Vaijapur; Accused arrested | वैजापुरात ऐंशी हजारांचा गुटखा पकडला; आरोपी अटक

वैजापुरात ऐंशी हजारांचा गुटखा पकडला; आरोपी अटक

पोलिसांनी सांगितले की, वैजापूर शहर ते शिवराई रस्त्यावर शाह वस्ती आहे. येथील खालेद शाह याच्या घरामध्ये गुटखा साठवून ठेवल्याची माहिती पोलिसांना खबऱ्याकडून मिळाली. त्यानुसार शनिवारी रात्री पोलीस निरीक्षक सम्राटसिंह राजपूत, पोलीस उपनिरीक्षक विजय जाधव, पोलीस नाईक जालिंदर तमनर, संतोष पवार, कविता पवार यांच्या पथकाने सापळा रचून घरावर छापा टाकला. यात जवळपास ८० हजारांचा गुटखा आढळून आला. अवैधरीत्या विक्री करण्याच्या उद्देशाने हा गुटखा साठवून ठेवल्याप्रकरणी खालेद शहा याला अटक करण्यात आली. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून गुटख्याची मोठ्या प्रमाणावर विक्री वाढली आहे. पानटपऱ्यांसह छोट्या-मोठ्या दुकानांमधून गुटख्याची सर्रासपणे विक्री सुरू आहे.

फोटो - वैजापूर पोलिसांनी शहरानजीकच्या गायकवाड वाडी परिसरातील एका घरातून जवळपास ऐंशी हजारांचा जप्त केलेला गुटखा व अटक केलेला आरोपी.

Web Title: Eighty thousand gutkas seized in Vaijapur; Accused arrested