अठरा प्रकरणांत जातींचा घोळ !
By Admin | Updated: April 30, 2015 00:37 IST2015-04-30T00:26:30+5:302015-04-30T00:37:05+5:30
हणमंत गायकवाड ,लातूर वसंतराव नाईक आर्थिक विकास महामंडळाच्या वितरीत कर्जप्रकरणांत मोठ्या प्रमाणात गौडबंगाल समोर आले आहे़

अठरा प्रकरणांत जातींचा घोळ !
हणमंत गायकवाड ,लातूर
वसंतराव नाईक आर्थिक विकास महामंडळाच्या वितरीत कर्जप्रकरणांत मोठ्या प्रमाणात गौडबंगाल समोर आले आहे़ एका प्रकरणात एक तर दुसऱ्या प्रकरणात एकाच लाभार्थ्याची जात वेगवेगळी दाखवून कर्ज दिले आहे़ शिवाय, पत्त्यातही घोळ आहे़ एका प्रकरणात लातूरचा तर दुसऱ्या प्रकरणात औशाचा पत्ता लाभार्थ्याचा दर्शविण्यात आला आहे़ ही बाब माहितीच्या अधिकारात उघडकीस आली आहे़ २५१ लाभार्थ्यांना दोनदा कर्ज दिलेच़ शिवाय, २५१ मधील १८ प्रकरणात जातही वेगवेगळी दर्शविली.
भटक्या विमुक्त जाती जामातीतील नागरिकांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी वसंतराव नाईक आर्थिक विकास महामंडळाची स्थापना झाली़ या महामंडळाअंतर्गत लातूर जिल्ह्यात अनेक लाभार्थ्यांना कर्ज वितरीत करण्यात आले असून, वितरीत कर्जाची वसुलीही ठप्प आहे़ शिवाय, एकाच व्यक्तीला दोनदा कर्ज दिले आहे़ (अधिक वृत्त हॅलो/२ वर)
ही तर टायपिंग मिस्टेक : व्यवस्थापक जाधव
४कर्मचारी अपुरे आहेत़ रोजंदारीवर दोन कर्मचारी आहेत़ महामंडळाने मंजूर केलेले कर्ज प्रकरणे बरोबर आहेत़ लाभार्थीही योग्यच आहेत़ त्यांची जात व पत्ते बदलण्यात आली नाहीत़ केवळ टाईप मिस्टेकमुळे ही चूक झाली आहे़ कर्ज प्रकरणे आणि लाभार्थ्यांचे प्रस्ताव योग्यच आहेत़ त्यात काहीही दोष नाही़ ज्यांनी माहितीच्या अधिकारात ही माहिती घेतली आहे़ या अनुषंगाने सुनावणी होती़ मात्र त्यांना पत्र मिळाले नाही़ भ्रमणध्वनीवर त्यांना सुनावणीची तारीख सांगण्यात आली होती़ महामंडळाला बदनाम करण्याचा प्रयत्न होतोय, असे विभागीय व्यवस्थापक जाधव यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले़